टक्कल

आजच कटिंग करून आलो. मान्य केलं पाहिजे. टक्कल करायला पण हिंमत लागते. माझं आपलं त्रैमासिक केशकर्तन.

टक्स, चंद्रमा, गोटा , पिच, चमन,   कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षांत मला टकलाचं बेक्कार म्हणजे बेक्कार म्हणजे बेक्कार फॅसिनेश चंद ( आकर्षण  ) होतं. मेट्रिस्कमधला मॉर्फियस, ट्रिपल एक्स मधला विन डेजेल, ‘हिटमॅन’ गेम्स सीरीजचा नायक ही सर्व टकली मंडळी वारंवार पाहण्यात (आणि खेळण्यात) होती. त्यात माझ्या ओळखीतल्या एकांनी नुकतंच च्यकोट केलं होतं आणि ते भार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्री दिसत होतं.  (होतं काय, दिसतंच आजूनही ! मेंटेन केलंय) !!! त्यामुळे आपणही टक्कल करावं असं मला मनापासून वाटायचं… ‘मी टक्कल ठेवू का’ असंही घरी विचारायलं होतं मी पण तेव्हा  ‘पडेल रे, पडेल… थांब जरा’ असं सपाट  ( पण कॉन्फिडण्ट (कॉन्सिफिडण्डण्डण्ट (रिडण्डडण्डडण्डण्ट सारखं ) ) ) उत्तर मिळालं. माझा एक गेमर मित्र दर चार सहा महिन्यांनी गुळगुळीत करून यायचा. बालाजीला जाऊन आलेली काही मंडळीही भेटायची मधून अधून. नुस्ती ज्यलन व्हायची…

लवकरच मला माझे केस माझ्याइतक्याच आतुरतेने कीबोर्डकडे झेपावताना दिसले आणि टकलाचं वेड आपोआप ओसरलं. पण कधी काही पाहिलं किंवा ऐकलं अंधारात गेलेलं टक्कल पुन्हा डोकं वर काढतं. मधे एकदा “आसमा केहेता है रब से, तुमने चांद दो क्यू बनाए” ऐकलं… रहावलं नाही… त्यातच पुढे “एकमें रखा दै दाग दाग दूसरा है साफ साफ” आणि वर “सबकी नरज उसपे जाए” असंही आहे… कमाल… ( !!! )  टकलावर फुलटू झकास अशी ड्रॅगनवगैरे वाली मेंदी काढली तर ती कशी दिसेल असाही प्रश्न माझ्या मनात आहे. कदाचित तो प्रकार हेअर स्टाईलप्रमाणे टक्कल स्टाईल होऊन जाईल कोणास ठावूक (टकलावर मेंदीचा अजुन रंग ओला वगैरे गाणीही सुचतील) .

असो.

~नॅकोबा.

13 thoughts on “टक्कल

  1. Pingback: Tweets that mention टक्कल -- Topsy.com

  2. काही असो किंवा नसो, पण लग्नापुर्वी एकदा टक्कल केलं होतं, आणि तेंव्हाच्या गर्ल फ्रेंडने ( आताची बायको) माझ्याशी ओळख दाखवणं पण सोडलं होतं. :) तेंव्हा जरा विचार करून करा!!!

  3. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….
    पण लोक वाढदिवशी कटिंग का करतात?! आणिक वरती टकलावर पोष्टी लिहितात!! (कशाच्या वरती?)

  4. Takkal karanya baddal itke craze ka aste mulanchya manaat dev jaane…..????
    Aso, post bharriii zaliye…..

  5. हा हा .. टकलाची एवढी क्रेझ? भारी आहेस…
    मी तर गेल्या ३ वर्षात फक्त ४ वेळा कटिंग केलं आहे (म्हणजे करून घेतलं आहे ;) ) .. कारण आम्हाला लंब्या घन्या जुल्फांची क्रेझ :)

  6. घने मुलायम काले बाल, खिले खिले मतवाले बाल….
    डाबर आमला केश तेल…
    रेशम का एहसास लगे
    चेहेका कितना खास लगे…

    आप के बाल हो या श्रीदेवी के बाल. सालोसाल रखे खयाल
    डाबर आमला केश तेल.

  7. बायकांना स्वत:चं टक्कल स्वेच्छेने करायला अजूनच जास्त, पुरुषांपेक्षा जास्त, हिंमत लागते.

  8. e tu bekkkkkkar bhari lihitos….. :D
    Dave bai kasla bhari ahe…. khup diwasanni ashi jorjorat hastiye mi ektich :D
    ashakya bhari suchta tula… :)

    ani ho mukhhya mhanje mala Punyat gelya sarkha wattay…..
    tu Punyacha ahes ki nahi te mahiti nahi pan tu lihitos baba agadich Puneri…. bekkkkar..(btw bekkkar ha na amchya trek grp cha Prop. word hota asa amhi samjaycho 1 varsha purvi…. :D )

  9. Btw mazya comments hya tuzya overall saglya posts (poshts) sathi ahe…
    sudyanas sangane na lage… (pan tarihi apala ‘to be very clear’ :D )

  10. मानसी, धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत ! पोष्टी आवडल्या वाचून बरं वाटलं. आणि हो, मी पुण्याचाच. :D

  11. >>>बायकांना स्वत:चं टक्कल स्वेच्छेने करायला अजूनच जास्त, पुरुषांपेक्षा जास्त, हिंमत लागते.<<<
    खरं आहे. माझ्या एका जुन्या कलीगला अशा स्त्रियांबद्दल आणि त्यांच्या आत्मविश्वासाबद्दल प्रचंड आदर होता.

  12. @मैथिली, अगं ट्रिपल एक्स-१ बघ किंवा हिटमॅन सीरीझपैकी एखादा गेम खेळ, कदाचित त्या क्रेझचं कारण लक्षात येईल तुझ्या. नाही म्हणायला ट्रान्सपोर्टर वाला जेसन स्टॅथमही टकलू म्हणून खपून जाईल.
    दवे बाई, त्या हिटमॅनच्या टकलावर मेंदी नसली तरी एक बारकोड असतो. मागच्या बाजूला. त्यात त्याचा सांकेतिक ४७ क्रमांक गोंदवलेला असावा बहुदा.

  13. अनुज्ञा, तुझ्या प्रश्नाचं माझ्याकडे खरंच उत्तर नाही. पण गेल्या काही वाढदिवसाना मी त्या किंवा त्याच्या आदल्या दिवशी माझं डोकं न्हाव्यासमोर फिरवून आणल्याचं आठवतं. असे काही आणखी नमुनेही तुझ्या निरिक्षणात आहेत काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>