खरपूस
” यू सी, खरपूस इज ए स्टेट ऑफ फूड बिईंग रोस्टेड. इट लाईज समव्हेअर स्लाईटली आफ्टर ‘वेल रोस्टेड’ बट डेफिनटली बिफोर बर्न्ट …
” यू सी, खरपूस इज ए स्टेट ऑफ फूड बिईंग रोस्टेड. इट लाईज समव्हेअर स्लाईटली आफ्टर ‘वेल रोस्टेड’ बट डेफिनटली बिफोर बर्न्ट …
आमटी हा माझा जीव की प्राण. जेवणात आमटी नसली की माझं आडतं आणि असली तर भात किंवा पोळीव्यतिरिक्त बाकी काही लागत नाही. त्यामुळेच आज जेव्हा मी जेवणात आमटी खात होतो तेव्हा आकाश ठेंगणं झालं होतं, हात गगनाला टेकले होते आणि स्वर्ग पण दोन बोटं उरला होता. मग फार वेळ न दवडता मी तो स्वर्गीय वाटणारा दोन घास आमटीभात संपवला आणि समाधानाचा ढेकर यावा म्हणून कपात कोकाकोला ओतला…
आज पोहे करून पाहिले. पहिलाच प्रयत्न. त्यातल्यात्यात बरे जमले. तेल, मोहोरी थोडी कमी, पोहे थोडे आजून मऊ आणि न विसरता तिखट टाकलं की आजून चांगले होतील. पोह्यांचा ओळखीचा वास आला तेव्हा मस्त वाटलं.
गेल्या आठवड्यात ताईनं पोहे कसे करावेत ची मेल पाठवली होती. ती जमेल तशी फॉलो केली. पॅन मधे तेल घेताना भस्सकन तेल ओतलं गेलं. चमचा तसाच भरलेला आणि त्याच्या दुप्पट तेल पॅनमधे.
हा माझ्या घराच्या बाल्कनीत उभा राहून काढलेला फोटो… ते गाड्यांच्या पार्किंगच्या अलिकडे दिसतंय ते चिपोट्ले. मेक्सिकन गुर्रमॉं का काहीतरी असं त्याचं पूर्ण नाव आहे. या त्यांच्या साईटवर तपशील बघा. इथे काही निवडक पण उत्तम मेक्सिकन पदार्थ मिळतात. ताको, बुरीटो वगैरे. रोज घरीच स्वयंपाक करायचा या विचारानेच मला कंटाळा येतो
[/caption]
हीच ती जागा जिकडे मी स्वतःवर प्रयोग करून बघतो. आधी काहीही जमायचं नाही, आता निदान भात तरी करता येतो. अगदी गेल्या पंधरा दिवसांपर्यंत मी माझ्या हातचं खाणं झालं की झोपताना पाचक घेऊन झोपायचो… उगाच का रिस्क घ्या… आता भात जमतो आणि उकडलेल्या अंड्याचा एक पदार्थ ज्याला मी अंडाकरी समजून खातो.
[caption id=”attachment_119″ align=”aligncenter”
लवकरच दोन महिने होतील मी अमेरिकेत पोचून. घर, टीव्ही, इंटरनेट असल्या प्राथमिक गरजांची पूर्तता झाली. जसं जमेल तसं, कंटाळा आला नसेल तर किंवा लक्षात असेल तर घरी स्वयंपाकाचा प्रयत्न करतो नाहीतर घर ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीशेजारीच चिपोटले आहे त्यामुळे पोटापाण्याची पण फार चिंता नाही. दिनक्रमाचं एकूण गणितही आता सवयीचं झालंय.
एकूणच काय तर बेसिक पक्कं झालंय आता इकडेतिकडे उंडारायला, संगणकीय उचापती करायला हरकत नाही. ब्लॉग वाचणे, इंटरनेट वर