Currently browsing tag

मित्र

कायदा, गे आणि लिव इन रिलेशन

अलिकडे बऱ्याच ब्लॉग्जवर वाचतोय मी, सुप्रीम कोर्टानं लिव इन रिलेशन बेकायदेशीर नसल्याचं सांगितलंय म्हणे. आधी वाचलं तर काही कळेचना लोक काय बोलतायत. पुण्यात असतो तर लगेच कळलं असतं. इथे सातासमुद्रापार असल्या गोष्टी चवीचवीनं चघळणारी चौकडी नाही त्यामुळे कळण्यास फारसा मार्ग नाही.  ठिकठिकाणी चर्चा चालल्ये ती या नवीन निर्णयाची आणि समलिंगी संबंधांना परवानगी देणाऱ्या कायद्याची. एरवी असल्या (कोणत्याही सामाजिक, राजकीय इ.) विषयावर मी फारसं बोलत नाही. करायचीच असली तर आधी आचरट

ब्लॉगचा पत्ता बदलतोय, मुक्ताफळे डॉट कॉम !

नमस्कार मंडळी, गेले काही दिवस तुम्ही हा ब्लॉग वाचत आला आहात, प्रसंगी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त करत आला आहात. गेल्या साधारण महिन्यापासून चालवलेल्या या प्रयोगाला मिळत असलेला एकूण प्रतिसाद बघून मी हा ब्लॉग त्याच्या स्वतःच्या अशा, वेगळ्या, हक्काच्या संकेतस्थळावर हालविण्याचं ठरवलं आहे. आत्तापर्यंत http://mr.jaguarnac.com वर असलेला हा ब्लॉग http://www.muktafale.com या संकेतस्थळावर हालविण्यास सुरुवात झाली आहे. गूगल फ्रेंड कनेक्टचं विजेट नवीन घरात त्याच्या जागी जाऊन बसलंच आहे.

किस्सा

नवीन जागा, नवीन लोक, नवीन प्रदेश अशा परिस्थितीत बहुतेक माणूस जरा नेटका राहण्याचा आपोआपच प्रयत्न करत असावा. गेले काही महिने मी अत्यंत काळजीपूर्वक राहात होतो. घरून निघताना सर्व काही बंद आहे याची खात्री करणे, गोष्टी नजरेसमोर अथवा जागच्याजागी ठेवणे, आवश्यक गोष्टी जपून ठेवणे, किल्ल्या सांभाळणे वगैरे सुरळीत चाललं होतं.

ताप

पावसानं खरंच वैताग आणलाय. काल थोडासा काय भिजलो आणि रात्री लगेच हुडहुडी भरून अंग दुखून कसकस जाणवायला लागली. मग काय, गपचूप झोपलो क्रोसीन घेऊन. घरापासून इतकं दूर असताना बरं नाहीसं वाटण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. आई आणि आजीची फार आठवण आली. आज दिवसभर घरीच होतो, त्यात दुपारी एक मस्त भयाण स्वप्न पडलं… मज्जा आहे…

पाऊस

अंगावर पडणारऱ्या प्रत्येक थेंबासरशी ओलावलेलं मन शहारून उठतं… ओल्या मातीच्या सुगंधाप्रमाणे हळुवार दरवळत येते कोणाचीतरी आठवण… मग त्या आठवणीत चिंब चिंब भिजावं वाटतं… सिंहगडावर जाऊन कांदा-भजी खावीशी वाटतात आणि कोणाकोणाला अजून बरंच काय काय करावसं वाटतं… पाऊस आला की लोकांना फार काय काय रम्य आणि रोमांचक व्हायला लागतं.

मला नाही !!!

पावसात नक्की काय झालं यापेक्षा पावसानंतर काय झालं याच्या माझ्या आठवणी जास्त तीव्र आहेत

असेच काही फोटो

आज लिहायला विशेष काही सुचत नाहीये म्हणून काही फोटो अपलोड करणार आहे…

[caption id="attachment_78" align="alignleft" width="250" caption="सकाळ"]सकाळ[/caption]

सकाळ, लख्ख प्रकाश, झाडाच्या फांद्यांतून येणारे उन्हाचे कवडसे… नुसतं बाहेर बघितलं की शांत, स्वच्छ, प्रसन्न वाटतं.