असेच काही फोटो – २
आज परत एकदा लिहायला असं काही सुचत नाहीये म्हणून हे काही फोटो… या महिन्याच्या सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्कोच्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा काढलेला …
आज परत एकदा लिहायला असं काही सुचत नाहीये म्हणून हे काही फोटो… या महिन्याच्या सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्कोच्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा काढलेला …
पावसानं खरंच वैताग आणलाय. काल थोडासा काय भिजलो आणि रात्री लगेच हुडहुडी भरून अंग दुखून कसकस जाणवायला लागली. मग काय, गपचूप झोपलो क्रोसीन घेऊन. घरापासून इतकं दूर असताना बरं नाहीसं वाटण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. आई आणि आजीची फार आठवण आली. आज दिवसभर घरीच होतो, त्यात दुपारी एक मस्त भयाण स्वप्न पडलं… मज्जा आहे…
हा माझ्या घराच्या बाल्कनीत उभा राहून काढलेला फोटो… ते गाड्यांच्या पार्किंगच्या अलिकडे दिसतंय ते चिपोट्ले. मेक्सिकन गुर्रमॉं का काहीतरी असं त्याचं पूर्ण नाव आहे. या त्यांच्या साईटवर तपशील बघा. इथे काही निवडक पण उत्तम मेक्सिकन पदार्थ मिळतात. ताको, बुरीटो वगैरे. रोज घरीच स्वयंपाक करायचा या विचारानेच मला कंटाळा येतो
[/caption]
हीच ती जागा जिकडे मी स्वतःवर प्रयोग करून बघतो. आधी काहीही जमायचं नाही, आता निदान भात तरी करता येतो. अगदी गेल्या पंधरा दिवसांपर्यंत मी माझ्या हातचं खाणं झालं की झोपताना पाचक घेऊन झोपायचो… उगाच का रिस्क घ्या… आता भात जमतो आणि उकडलेल्या अंड्याचा एक पदार्थ ज्याला मी अंडाकरी समजून खातो.
[caption id=”attachment_119″ align=”aligncenter”