Currently browsing tag

देव

बिनबुडाचं

बिनबुडाचं विधान, विधान सभा, सभा त्याग, त्यागाचं मार्केटिंग, मार्केटिंग चेन, चेन स्मोकिंग, स्मोकिंग हॉट् बिनबुडाचं विधान, घागरी बूड, खीर नाही खाल्ली, पण …

चित्रपटपूर्ण रविवार

आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.

मटका

मटका – हा मूळचा जुगारी शब्द असावा. मी कॉलेजची जवळजवळ सहा वर्षं सायबर कॅफेत गेम्स खेळत काढल्येत त्यामुळे माझ्या वापरातील मटक्याचा अर्थ “उगाच काहीतरी करायचं म्हणून करता करता घडलेली अशक्य भारी गोष्ट” असा होतो. काउंटर स्ट्राईक सारख्या गेम्स मधे याचा वरचेवर प्रत्यय येतो. खेळात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्याने नवख्याने नेमका मोक्याचा, अनुभवी मोहरा टिपला की चार पाच शिव्यांमागून “साल्या मटक्या” हमखास ऐकायला मिळते.

असे हे मटके कधीकधी रोजच्या आयुष्यातही घडतात

चित्रपट – जनरल आवड

आज उगाचच जरा आवडत्या चित्रपटांबद्दल लिहावसं वाटलं म्हणून ही पोस्ट. सध्या नेटफ्लिक्स वर बरेच इंग्रजी चित्रपट बघणं चाललंय पण बऱ्याच दिवसात हिंदी चित्रपट पाहिला नाही.पुण्यात सिटीप्राईड कोथरूड घरापासून अगदीच पाच मिनिटांवर असल्यानं महिन्यातून किमान दोन तरी चित्रपट पाहून व्हायचे. गेल्या महिन्यात “रण” पाहिला, आवडला. रोड, मूवी पाहायची फार इच्छा आहे पण कोण जाणे का, डाऊनलोड करावासा वाटत नाहीये.

पोस्ट : अशी का तशी?

कधीकधी अचानक जोरात पोस्ट लागलीय असं वाटू लागतं पण तेव्हा नेमकं ऑफिसमधे किंवा बसमधे असल्याने बसता येत नाही. घरी येऊन निवांत बसावं म्हणलं तर तोवर पोस्ट सोयिस्करपणे जिरलेली असते… कधी बसल्यानंतर कळतं की फॉल्स आलार्म होता… थोडंसं लिहून तो ड्राफ्ट सेव होतो आणि कधीतरी आपण पूर्ण होऊ ही आशा धरून तशीच बसून राहते. अशा बऱ्याच जिरलेल्या किंवा विझलेल्या पोस्ट्सनंतर जेव्हा एखादी पोस्ट ब्लॉगचं मुखपृष्ठ पाहते तेव्हा बरं वाटतं.

स्वप्न

एक खोली, उजवीकडेही एक खोली असावी, दरवाजा नाही पण त्या खोलीत स्पष्ट अंधार आहे. या खोलीतही एकूणच मंद प्रकाश. हिरवट निळसर भिंत, अशा खोलीत आपण एकटेच. आपल्याच उद्योगात… अचानक आपल्याला दाराशी एक आजीबाई दिसतात. जवळच्याच कुटुंबातील सदस्य असाव्यात… ही खोलीची दुसरी बाजू, बाहेर जाणारी. त्या आजीबाई तिथेच बसतात, ठाण मांडून… चुकल्यात वाटतं… आपल्याशी काहीतरी बोलतात. आपण मख्ख, यांना आपण ओळखतो का याच विचारात. …

चकोट

इतर पोस्ट्सपेक्षा जरा वेगळा, हा जरा तांत्रिक पोस्ट आहे. च ची भाषा माहीत नसेल असा मराठी माणूस विरळाच. लहानपणी सगळ्यांनीच कधी ना कधीतरी ही भाषा वापरली असेलच. संदीप खरेचं एक गाणंही आहे “चम्हालातु चंगतोसा चमी चकए चष्टगो” म्हणून. मी प्रोग्रॅमर, सतत काही ना काही उपद्व्याप करून बरंच काही शिकलो. सध्या जरा थंड असले तरी मधूनअधून उपद्व्याप चालूच असतात. तसंच आज सहज म्हणून म्हणलं, एक असा प्रोग्रॅम करावा…

पाऊस

अंगावर पडणारऱ्या प्रत्येक थेंबासरशी ओलावलेलं मन शहारून उठतं… ओल्या मातीच्या सुगंधाप्रमाणे हळुवार दरवळत येते कोणाचीतरी आठवण… मग त्या आठवणीत चिंब चिंब भिजावं वाटतं… सिंहगडावर जाऊन कांदा-भजी खावीशी वाटतात आणि कोणाकोणाला अजून बरंच काय काय करावसं वाटतं… पाऊस आला की लोकांना फार काय काय रम्य आणि रोमांचक व्हायला लागतं.

मला नाही !!!

पावसात नक्की काय झालं यापेक्षा पावसानंतर काय झालं याच्या माझ्या आठवणी जास्त तीव्र आहेत