Currently browsing tag

दुपार

ताप

पावसानं खरंच वैताग आणलाय. काल थोडासा काय भिजलो आणि रात्री लगेच हुडहुडी भरून अंग दुखून कसकस जाणवायला लागली. मग काय, गपचूप झोपलो क्रोसीन घेऊन. घरापासून इतकं दूर असताना बरं नाहीसं वाटण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. आई आणि आजीची फार आठवण आली. आज दिवसभर घरीच होतो, त्यात दुपारी एक मस्त भयाण स्वप्न पडलं… मज्जा आहे…

स्वप्न

एक खोली, उजवीकडेही एक खोली असावी, दरवाजा नाही पण त्या खोलीत स्पष्ट अंधार आहे. या खोलीतही एकूणच मंद प्रकाश. हिरवट निळसर भिंत, अशा खोलीत आपण एकटेच. आपल्याच उद्योगात… अचानक आपल्याला दाराशी एक आजीबाई दिसतात. जवळच्याच कुटुंबातील सदस्य असाव्यात… ही खोलीची दुसरी बाजू, बाहेर जाणारी. त्या आजीबाई तिथेच बसतात, ठाण मांडून… चुकल्यात वाटतं… आपल्याशी काहीतरी बोलतात. आपण मख्ख, यांना आपण ओळखतो का याच विचारात. …

दिवस घालवला उठारेठी

माझ्या आईची आवडती म्हण आहे, “दिवस घालवला उठारेठी, चांदण्याखाली कापूसवाटी…”. एक आजी सोडली तर आमच्या घरच्या सगळ्यांना ही म्हण व्यवस्थित लागू होते. दिवसा वेळ नसतो असं नाही. वेळ पुष्कळ असतो पण तो नको तिथे वाया जातो किंवा कधीकधी जाणूनबुजून इकडेतिकडे घालवण्यात येतो. मग दिवस संपत आला, की बसतो आम्ही जागत, दिवसाचा बॅकलॉग भरत.