Currently browsing tag

चावट

बकुळीची फुलं

“हे बघून तू वेडा होणारेस!!!” सॅकमधून पाचपंचवीस सीड्यांचे दोन मनोरे बाहेर काढत स्वप्नील. “भेंडी !!!! चिन्याचं कलेक्शन????? कडक !!!!!!” केतनचा गेम पॉझ. …

एपिसोड

काही संवाद, घटना अन् पात्र मित्र – असं धार सोडून चालणार नाही… नायक –  अं?????? मित्र - सगळं काही नीट होईल… नायक – …

अर्थमैथुन : टमरेल

सूचना. : ही थोडी तसली पोस्ट आहे त्यामुळे हे असलं काही ज्यांना आवडत नाही त्यांनी वाचणं इथेचच थांबवावं. टमरेल. हे रंगीत असतं. …

कायदा, गे आणि लिव इन रिलेशन

अलिकडे बऱ्याच ब्लॉग्जवर वाचतोय मी, सुप्रीम कोर्टानं लिव इन रिलेशन बेकायदेशीर नसल्याचं सांगितलंय म्हणे. आधी वाचलं तर काही कळेचना लोक काय बोलतायत. पुण्यात असतो तर लगेच कळलं असतं. इथे सातासमुद्रापार असल्या गोष्टी चवीचवीनं चघळणारी चौकडी नाही त्यामुळे कळण्यास फारसा मार्ग नाही.  ठिकठिकाणी चर्चा चालल्ये ती या नवीन निर्णयाची आणि समलिंगी संबंधांना परवानगी देणाऱ्या कायद्याची. एरवी असल्या (कोणत्याही सामाजिक, राजकीय इ.) विषयावर मी फारसं बोलत नाही. करायचीच असली तर आधी आचरट

चड्डी

काय हे ! चड्डी या नावानी पोस्ट टाकतं का कोणी… आणि टाकावी तरी का? चार लोक (सूज्ञ लोक) भेटले तर या विषयावर साधं बोलतही नाहीत. सार्वजनिक चर्चा नाहीत, परिसंवाद नाहीत, रियॅलिटी शो नाही… मग कोणी पोस्ट तरी का टाकावी? टीव्हीवर आणि सिनेमात बरेचदा डोळ्यांसमोर ढळढळीतपणे दिसत असतानाही कोणी हिच्याबद्दल उघडपणे चारचौघात बोलत नाही. एवढ्या परिचयाच्या आणि ओळखीच्या वस्तूला असं अनुल्लेखानं का मारतो आपण ?

हुक्की

आज ब्लॉगपोस्ट करायची मजबूत हुक्की आलीय… हुक्की, साधीसुधी इच्छा नाही तर चक्क हुक्की. एरवी मधून अधून होत असते इच्छा, इथे काहीतरी लिहायची पण या ना त्या कारणानी दुर्लक्ष होतं. आज मात्र या इच्छेचा वेग प्रचंड आहे. काहीतरी खरडल्याशिवाय राहावत नाईये.

लिहायचा विचार डोक्यात आला की वाट्टेल ते लिहिता येईल असं वाटतं पण प्रत्यक्षात कीबोर्ड बडवायला बसलं की विचाराचा पोपट होऊन भुर्रर्र उडून जातो.