Currently browsing tag

गूगल

पुढच्या वेळी विचारू नका

काल आईनं सांगितलं की पेपरात फायरफॉक्सवर कसलासा लेख आलाय म्हणे. लेखाच्या आदल्याच दिवशी तिला फायरफॉक्स बघायला मिळाला होता त्यामुळे तिनं मला या …

ब्लॉगचा पत्ता बदलतोय, मुक्ताफळे डॉट कॉम !

नमस्कार मंडळी, गेले काही दिवस तुम्ही हा ब्लॉग वाचत आला आहात, प्रसंगी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त करत आला आहात. गेल्या साधारण महिन्यापासून चालवलेल्या या प्रयोगाला मिळत असलेला एकूण प्रतिसाद बघून मी हा ब्लॉग त्याच्या स्वतःच्या अशा, वेगळ्या, हक्काच्या संकेतस्थळावर हालविण्याचं ठरवलं आहे. आत्तापर्यंत http://mr.jaguarnac.com वर असलेला हा ब्लॉग http://www.muktafale.com या संकेतस्थळावर हालविण्यास सुरुवात झाली आहे. गूगल फ्रेंड कनेक्टचं विजेट नवीन घरात त्याच्या जागी जाऊन बसलंच आहे.

चड्डी

काय हे ! चड्डी या नावानी पोस्ट टाकतं का कोणी… आणि टाकावी तरी का? चार लोक (सूज्ञ लोक) भेटले तर या विषयावर साधं बोलतही नाहीत. सार्वजनिक चर्चा नाहीत, परिसंवाद नाहीत, रियॅलिटी शो नाही… मग कोणी पोस्ट तरी का टाकावी? टीव्हीवर आणि सिनेमात बरेचदा डोळ्यांसमोर ढळढळीतपणे दिसत असतानाही कोणी हिच्याबद्दल उघडपणे चारचौघात बोलत नाही. एवढ्या परिचयाच्या आणि ओळखीच्या वस्तूला असं अनुल्लेखानं का मारतो आपण ?

मटका

मटका – हा मूळचा जुगारी शब्द असावा. मी कॉलेजची जवळजवळ सहा वर्षं सायबर कॅफेत गेम्स खेळत काढल्येत त्यामुळे माझ्या वापरातील मटक्याचा अर्थ “उगाच काहीतरी करायचं म्हणून करता करता घडलेली अशक्य भारी गोष्ट” असा होतो. काउंटर स्ट्राईक सारख्या गेम्स मधे याचा वरचेवर प्रत्यय येतो. खेळात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्याने नवख्याने नेमका मोक्याचा, अनुभवी मोहरा टिपला की चार पाच शिव्यांमागून “साल्या मटक्या” हमखास ऐकायला मिळते.

असे हे मटके कधीकधी रोजच्या आयुष्यातही घडतात

फीडली – ब्लॉग वाचण्याचे एक उत्तम साधन.

[caption id="attachment_67" align="aligncenter" width="300" caption="फीडली"]Feedly[/caption]

गेला साधारण एक महिना मी माझे आवडते ब्लॉग आणि गूगलवरच्या बातम्या वाचण्यासाठी “फीडली” नावाचा एक फीड रीडर वापरतोय. फीडली हा फायरफॉक्स आणि गूगल क्रोम चा विस्तार म्हणून स्थापन करता येतो (म्हणजे, इट कॅन बी इन्स्टॉल्ड अॅज ए फायरफॉक्स ऑर गूगल क्रोम एक्स्टेंशन)

कबाब मे हड्डी

काय सुरेख दिवस चालले होते… चार सहा वर्षं नक्कीच झाली असतील… तो माझ्यासाठी खूप काही करायचा, नाही, अजूनही करतो… फक्त माझ्यासाठीच नाही तर आनेक जणांसाठी त्याचं काही ना काहीतरी चालू असतं.हेच त्याचं नेमकं मला आवडतं. परवा मात्र जे काही घडलं त्याने मी पुरता गोंधळून गेलोय… अगदीच अनपेक्षित गोष्ट. तसा हे त्याच्या स्वभावात आहेच, थोडा मिश्किलपणा, लोकांना अचंबित करण्याची आवड… पण परवा नक्की काय घडलं ते मला अजून पुरेसं कळलंच

दुसर्यांदा सीमोल्लंघन

जवळजवळ वर्षं होत आलं होतं हा ब्लॉग सुरू करून. गेल्या वर्षी दसर्याच्या मुहूर्तावर हा ब्लॉग सुरू केला खरा, पण यावर काही लिहिण्याच्या बाबतीत मात्र पार बट्ट्याबोळ होता… नाही म्हणायला अगदीच ५-७ पोस्ट्स होत्या… पण फार विशेष असे काही नाही.
मी तसा संगणकवेडा त्यामुळे माझा हा ब्लॉग सुद्धा मी स्वतःच्या संगणकावरून चालवला होता (भारी वाटतं… करून बघा !).