Currently browsing tag

काम

पुढच्या वेळी विचारू नका

काल आईनं सांगितलं की पेपरात फायरफॉक्सवर कसलासा लेख आलाय म्हणे. लेखाच्या आदल्याच दिवशी तिला फायरफॉक्स बघायला मिळाला होता त्यामुळे तिनं मला या …

मटका

मटका – हा मूळचा जुगारी शब्द असावा. मी कॉलेजची जवळजवळ सहा वर्षं सायबर कॅफेत गेम्स खेळत काढल्येत त्यामुळे माझ्या वापरातील मटक्याचा अर्थ “उगाच काहीतरी करायचं म्हणून करता करता घडलेली अशक्य भारी गोष्ट” असा होतो. काउंटर स्ट्राईक सारख्या गेम्स मधे याचा वरचेवर प्रत्यय येतो. खेळात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्याने नवख्याने नेमका मोक्याचा, अनुभवी मोहरा टिपला की चार पाच शिव्यांमागून “साल्या मटक्या” हमखास ऐकायला मिळते.

असे हे मटके कधीकधी रोजच्या आयुष्यातही घडतात

ताप

पावसानं खरंच वैताग आणलाय. काल थोडासा काय भिजलो आणि रात्री लगेच हुडहुडी भरून अंग दुखून कसकस जाणवायला लागली. मग काय, गपचूप झोपलो क्रोसीन घेऊन. घरापासून इतकं दूर असताना बरं नाहीसं वाटण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. आई आणि आजीची फार आठवण आली. आज दिवसभर घरीच होतो, त्यात दुपारी एक मस्त भयाण स्वप्न पडलं… मज्जा आहे…

स्वप्न

एक खोली, उजवीकडेही एक खोली असावी, दरवाजा नाही पण त्या खोलीत स्पष्ट अंधार आहे. या खोलीतही एकूणच मंद प्रकाश. हिरवट निळसर भिंत, अशा खोलीत आपण एकटेच. आपल्याच उद्योगात… अचानक आपल्याला दाराशी एक आजीबाई दिसतात. जवळच्याच कुटुंबातील सदस्य असाव्यात… ही खोलीची दुसरी बाजू, बाहेर जाणारी. त्या आजीबाई तिथेच बसतात, ठाण मांडून… चुकल्यात वाटतं… आपल्याशी काहीतरी बोलतात. आपण मख्ख, यांना आपण ओळखतो का याच विचारात. …

चिपोट्ले

चिपोट्ले

चिपोट्ले

हा माझ्या घराच्या बाल्कनीत उभा राहून काढलेला फोटो… ते गाड्यांच्या पार्किंगच्या अलिकडे दिसतंय ते चिपोट्ले. मेक्सिकन गुर्रमॉं का काहीतरी असं त्याचं पूर्ण नाव आहे. या त्यांच्या साईटवर तपशील बघा. इथे काही निवडक पण उत्तम मेक्सिकन पदार्थ मिळतात. ताको, बुरीटो वगैरे. रोज घरीच स्वयंपाक करायचा या विचारानेच मला कंटाळा येतो

आठवडा

उद्या आठवडा संपेल. हा आठवडा तसा अवघड गेला… विशेषकरून सकाळ. अख्खा आठवडाभर एकतर पावसाळी हवा होती नाहीतर पाऊस तरी. पावसामुळे गार पडलेली हवा, खवखवणारा घसा आणि उठल्याठल्या जाम झालेलं नाक… सकाळी उठूच नये असं कितीही वाटलं तरी साडेसात च्या आत पांघरूणातून बाहेर पडावंच लागतं… नाहीतर वेळेत आवरून होत नाही, शेवटची बस चुकते आणि एक तास चालून ऑफिसला पोहोचावं लागतं.

या आठवड्यात राईस कुकर घेतला, आता भात बराच बरा होतो

दिवस घालवला उठारेठी

माझ्या आईची आवडती म्हण आहे, “दिवस घालवला उठारेठी, चांदण्याखाली कापूसवाटी…”. एक आजी सोडली तर आमच्या घरच्या सगळ्यांना ही म्हण व्यवस्थित लागू होते. दिवसा वेळ नसतो असं नाही. वेळ पुष्कळ असतो पण तो नको तिथे वाया जातो किंवा कधीकधी जाणूनबुजून इकडेतिकडे घालवण्यात येतो. मग दिवस संपत आला, की बसतो आम्ही जागत, दिवसाचा बॅकलॉग भरत.

कैच्याकै – १

कामवाल्या बाईचा जन्म हा केवळ मोक्याच्या वेळी सुट्टी घेण्यासाठी झाला आहे.

——

मगाशी,

मारत होतो मी माशी,

खाजवत माझी मिशी

विचार करत स्वतःशी,

की अजून मेली नाही कशी.

——

मला आजवर स्वतःला शिस्त लावता आलेली नाही. पण मी इतरांना शिस्त लावू शकेन….

कारण आजवर तशी मला स्वतःला लाथही मारता आलेली नाही

वेक अप सिड

वेक अप सिड पाहिला….

खटकेल इतक्या वेळा मुंबईला बॉम्बे म्हणलंय खरं… पण तो अपवाद वगळता चित्रपट सुंदर !

कोंकणा काम छानच करते. ती ज्यात असते ते चित्रपट शक्यतो चांगले असतात, त्यामुळे वेक अप सिड ची मी बरेच दिवस वाट बघत होतो. चांगला असेल, बर्याच दिवसांनी काहीतरी छान बघायला मिळेल अशी अपेक्षा होती आणि ती खरी सुद्धा ठरली. बरं वाटलं…

~नॅकोबा