Currently browsing tag

आळस

अनाचरटीय असुचेतन ब्ळॅ

सध्या. पोष्टीची सुरुवात सध्या नी केली की रटाळ अन् कंटाळवाणं बरंच काय काय सध्याच्या नावाखाली खपवता येतं. (इथे वाचा) ब्लॉग सुरू करून …

चित्रपटपूर्ण रविवार

आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.

आमटी

आमटी हा माझा जीव की प्राण. जेवणात आमटी नसली की माझं आडतं आणि असली तर भात किंवा पोळीव्यतिरिक्त बाकी काही लागत नाही. त्यामुळेच आज जेव्हा मी जेवणात आमटी खात होतो तेव्हा आकाश ठेंगणं झालं होतं, हात गगनाला टेकले होते आणि स्वर्ग पण दोन बोटं उरला होता. मग फार वेळ न दवडता मी तो स्वर्गीय वाटणारा दोन घास आमटीभात संपवला आणि समाधानाचा ढेकर यावा म्हणून कपात कोकाकोला ओतला…

पाऊस

अंगावर पडणारऱ्या प्रत्येक थेंबासरशी ओलावलेलं मन शहारून उठतं… ओल्या मातीच्या सुगंधाप्रमाणे हळुवार दरवळत येते कोणाचीतरी आठवण… मग त्या आठवणीत चिंब चिंब भिजावं वाटतं… सिंहगडावर जाऊन कांदा-भजी खावीशी वाटतात आणि कोणाकोणाला अजून बरंच काय काय करावसं वाटतं… पाऊस आला की लोकांना फार काय काय रम्य आणि रोमांचक व्हायला लागतं.

मला नाही !!!

पावसात नक्की काय झालं यापेक्षा पावसानंतर काय झालं याच्या माझ्या आठवणी जास्त तीव्र आहेत

हुक्की

आज ब्लॉगपोस्ट करायची मजबूत हुक्की आलीय… हुक्की, साधीसुधी इच्छा नाही तर चक्क हुक्की. एरवी मधून अधून होत असते इच्छा, इथे काहीतरी लिहायची पण या ना त्या कारणानी दुर्लक्ष होतं. आज मात्र या इच्छेचा वेग प्रचंड आहे. काहीतरी खरडल्याशिवाय राहावत नाईये.

लिहायचा विचार डोक्यात आला की वाट्टेल ते लिहिता येईल असं वाटतं पण प्रत्यक्षात कीबोर्ड बडवायला बसलं की विचाराचा पोपट होऊन भुर्रर्र उडून जातो.

दुसर्यांदा सीमोल्लंघन

जवळजवळ वर्षं होत आलं होतं हा ब्लॉग सुरू करून. गेल्या वर्षी दसर्याच्या मुहूर्तावर हा ब्लॉग सुरू केला खरा, पण यावर काही लिहिण्याच्या बाबतीत मात्र पार बट्ट्याबोळ होता… नाही म्हणायला अगदीच ५-७ पोस्ट्स होत्या… पण फार विशेष असे काही नाही.
मी तसा संगणकवेडा त्यामुळे माझा हा ब्लॉग सुद्धा मी स्वतःच्या संगणकावरून चालवला होता (भारी वाटतं… करून बघा !).