शिर्षकच एवढं मोठ्ठं द्यायचं की वाचूनच लोकांनी म्हणलं पाहिजे की अरे काय चाललंय काय ही काय पद्धत झाली पोष्टीचं शीर्षक द्यायची? उद्या अख्खा निबंध लिहून झाल्यावर म्हणाल की चला निबंधाचं नाव तरी ठरलं बुवा. आता निबंध लिहायला हरकत नाही.

हे म्हणजे असं झालं की पोटभर जेवायचं अन् म्हणायचं की आता मस्तपैकी लंचला जावं कुठेतरी. आता तुम्हाला वाटेल की हुश्श बुवा संपलं एकदाचं शीर्षक. आता पोष्ट. एकदा वाचून झाली की आपण सुटलो. वगैरे. पण तसं नसतं. ब्यादेचं नाव कळलं तरी ब्याद काही जात नाही. ब्याद ही ब्याद असते. अन् तिला यमक जुळवायचंच म्हणून ही ओळ बाद असते. आता बाद चा विषय निघालाच आहे म्हणून सांगावसं वाटतं की सद्यस्थितीत डोकं हा प्रकार सपशेल बाद असल्याकारणानं एका वैचारिक बादलीक एकापाठोपाठ एक शब्द सोडून ते ब्लॉगावर ओतायचा आटापिटा चालला आहे.

एक मांजर.

एक मांजर.

डोक्यातले विचार बाहेर पडायला लागले तर त्यातून एकतरी बोका नक्कीच उडी मारणार. कोणीतरी म्हणलेलंच आहे, माझिया मनी म्याव, त्यास मांजर ऐसे नाव.

आता एवढा गबदुल प्राणी डोक्यातून बाहेर पडल्यावर आत आपसूकच जागा होणार. त्यामुळे शाब्दिक ओताओती आता बंद.

 

इति.

~नॅकोबा.

2 thoughts on “शिर्षकच एवढं मोठ्ठं द्यायचं की वाचूनच लोकांनी म्हणलं पाहिजे की अरे काय चाललंय काय ही काय पद्धत झाली पोष्टीचं शीर्षक द्यायची? उद्या अख्खा निबंध लिहून झाल्यावर म्हणाल की चला निबंधाचं नाव तरी ठरलं बुवा. आता निबंध लिहायला हरकत नाही.

Leave a Reply