गुरुत्वाकर्षण…
सिंप्ली पुट युसी… यव्रीथिंग धॅट ह्याझ मास, अट्र्यॅक्ट्स यव्रीथिंग यल्स धॅट ह्याझ मास.
आपल्या पॅन्क्रीयाज या गाण्यात वीअर्ड अॅल यांकोविक म्हणतो :
“माय पॅन्क्रियाज अॅट्रॅक्ट एव्री अदर पॅन्क्रियाज विथ अ फोर्स
प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस
अॅण्ड इन्वर्सली प्रपोर्शनल टु द डिस्टन्स बिट्वीन देम”
एरवी सुमडीत असणारी ही शक्ती तुम्ही धडपडल्यावर मात्र अगदी वाट्टेल तिथे कार्यभाग साधते. स्थिती, गती, काळ अन् बळ वगैरे मंडळींची गणितं अचानक कार्यन्वित होतात अन् नको नको त्या भागाकारावर गुणाकार करून कपाळी आठ्या आणतात…..
परवा असंच झालं.
मी ऑफिसमधून बाहेर पडलो. शुक्रवार संध्याकाळची वेळ होती. मी आनंदात होतो. (पण आनंद गगनात मावत नव्हता) सायकल काढली. गेले साडेतीन महिने सलग सायकलने ऑफिसात येतोय याचा उगाचच अभिमान वाटला. कुलूप काढून मस्तपैकी सायकलवर स्वार झालो अन् घराच्या दिशेने कूच केलं . ऑफिसच्या मागूनच एक पायवाट जाते. ती वाट शेजारची इमारत ओलांडून पलिकडच्या इमारतीच्या पार्किंग लॉटमधून बाहेर पडते. मीही तिच्याबरोबरच बाहेर पडलो. संध्याकाळी या लॉटमधे जेमतेम दोनचारच वाहने असतात. या माहितीची खरंतर काहीच गरज नाहीये पण सुचतंय म्हणून लिहून मोकळा होतोय.
तर पार्किंग लॉट. याच्या दुसऱ्या बाजूनं एक साईडवॉक (पदपथ, फूटपाथ वगैरे) आहे. त्यावरून थोडं पुढे गेलं की सायकल रस्त्यावर आणता येते. खरं तर सरळ ऑफिससमोरच्या रस्त्यावरून सायकल हाकत पुढे डावीकडे वळून याच रस्त्यावर येता येतं, पण तो रस्ता प्रचंड रहदारीचा असतो, शिवाय मागच्या पाऊलवाटेवर कधीकधी मांजर बसलेलं दिसतं म्हणून मी मागचीच वाट पकडतो. लॉटमधून साईडवॉकवर यायची ही वाट अत्यंत अरुंद आहे. बारीक आहे म्हणलात तरी हरकत नाही. महामार्ग आहे म्हणलात तरी माझी काय हरकत असणारे म्हणा.
तर असा हा लॉट पार करता करता आज घरी गेल्यावर काय करावं या विवंचनेत माझं मन गुंतलं होतं. (थोडक्यात, रस्त्यावर लक्ष नव्हतं…) त्याच गहन विचाराच (नादात) मी या चिंचोळ्या वाटेवर आलो खरा, पण वाट संपता संपता माझी मात्र पार वाट लागली.
त्याचं काय झालं… की वाटेवरून वळता वळता सायकलचं पुढचं चाक त्या चिंचोळ्या वाटेच्या कडेला असलेल्या इन मीन दोन इंच उंड कठड्यावर आपटून थांबलं. मागचं चाक मागच्यामागं उचललं गेलं. एरव्ही जर मी शहाण्यासारखा सिटावर बसून सायकल दामटत असतो तर आजवरच्या कुक्कुटसेवनाने प्राप्त झालेल्या शारिरिक क्षमतेने (यालाच वजन असेही म्हणतात) ते आपसूक खाली आलं असतं. पण माज !!! मी अक्षरशः हॅंडलवर रेलून होतो.
आता जे घडलं ते घडायला सेकंदही लागलं नसेल. मागचं चाक वर आलं. अचानक माझं संपूर्ण वजन हॅंडलवर आल्यानं ते पुढे झुकलं, मागचं चाक आणखी वर. शिवाय वळण्याची प्रक्रिया सुरू असल्यानं एकूण सामुग्री डावीकडे कलू लागली… हात हॅंडलवरून सुटले, गुडघे हॅंडलच्या दिशेनं झेपावले, जमीन माझ्या दिशेनं येऊ लागली अन्
अन् मी पडलो. धप्प्.
सायकल टुणटुणीत, मी किंचित मुक्यामारावर निभावलो. सात-आठ वर्षांपूर्वी सवयीचा असलेला तो अनुभव परत अनुभवताना मात्र एक वेगळाच आनंद जाणवला. धडपडून झाल्यावर पहिल्यांदाच माझ्या चेहऱ्यावर हसू होतं.
गुरुत्वाकर्षण नावाला. मला ते गाणं टाकायला कारण हवं होतं
~नॅकोबा !!
गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत ठाऊक असल्याने काही व्यक्ती दुसर्यांना सतत शेवग्याच्या झाडावर चढवण्यात गुंतलेली असतात. मजा बघायला निमित्त!
व्हिडीओ छान आहे.
नॅकोबा, फुल सुटलायत… ही पोस्ट न्यूटनकाकांना फॉरवर्ड करून टाका कशी….
“ती वाट शेजारची इमारत ओलांडून पलिकडच्या इमारतीच्या पार्किंग लॉटमधून बाहेर पडते. मीही तिच्याबरोबरच बाहेर पडलो. ”

बाकी सगळं आधीच्या कॉमेंटकारांनी सांगितलंय…
chan majja ali wachtana pan tu konabarobar baher padalas te nahi kalala…
bahutek mhanunach tuza laksha navata
ani mhanunach padalas
ani mhanunach padun pan hasalas
he he
pan kharach chan hota
@कांचनताई, खरंय, पण कधीकधी अशी चढवलेली मंडळी वरच्यावर दुसऱ्या झाडावर उडी मारतात. मग खालचे नुसते आ वासून बघत बसतात अन् वरचे गालातल्या गालात हसत बसतात. ते गुरुत्वाकर्षणाला अपवाद ठरतात… पण, अगदीच कधीकधी अगदीsssssच कधीतरी.
@सपा, धन्स.
@हेओ, न्यूटनकाका पडतील घेरी येऊन. धप्पकन
@अनुज्ञा,
@चैतन्य, रिप्लायबद्दल थॅंक्यू रे,
अरे मी ‘वाटे’बरोबर बाहेर आलो. वाट जिथून बाहेर येते तिथून मीही बाहेर आलो पण तिच्याबरोबर बाहेर आलो असं म्हणून त्या वाटेला व्यक्तिरूप देण्याचा प्रयत्न वगैरे केलाय मी. हे असलं होतं अरे कधीकधी, फार मनावर घेऊ नकोस.
>> तर आजवरच्या कुक्कुटसेवनाने प्राप्त झालेल्या शारिरिक क्षमतेने (यालाच वजन असेही म्हणतात)
ख्या ख्या खी खी….
कल्याणीनगरचं वर्णन वाटतंय, मॅरिप्लेक्सचं