ब्लॉगचा पत्ता बदलतोय, मुक्ताफळे डॉट कॉम !

नमस्कार मंडळी, गेले काही दिवस तुम्ही हा ब्लॉग वाचत आला आहात, प्रसंगी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त करत आला आहात. गेल्या साधारण महिन्यापासून चालवलेल्या या प्रयोगाला मिळत असलेला एकूण प्रतिसाद बघून मी हा ब्लॉग त्याच्या स्वतःच्या अशा, वेगळ्या, हक्काच्या संकेतस्थळावर हालविण्याचं ठरवलं आहे. आत्तापर्यंत http://mr.jaguarnac.com वर असलेला हा ब्लॉग http://www.muktafale.com या संकेतस्थळावर हालविण्यास सुरुवात झाली आहे. गूगल फ्रेंड कनेक्टचं विजेट नवीन घरात त्याच्या जागी जाऊन बसलंच आहे. मराठील्बॉग्ज डॉट नेट वरही ही नवीन जागा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे असं का केलं ? माझ्याकडे उत्तर नाही. हे असले उपद्व्याप करण्यातच आनंद असतो, नकळत काहीतरी नवीन शिकायला मिळतं. मनातला बोका आनंदित होतो ! बरं वाटतं.  मुक्ताफळे डॉट कॉमची नोंदणी करून पण बरेच दिवस झाले होते. पंधरा वीस दिवसांपूर्वी त्याचं रजिस्ट्रेशन माझ्या जुन्या सर्विस प्रोव्हायडरकडून नवीन प्रोव्हायडरकडे फिरवून घेतलं. आता कसं, नाव लक्षात ठेवायलाही सोप्पं झालंय अगदी. :) या सर्व बदलाची एकमेव पडती बाजू हीच की जुन्या जागेवर साईट जॉईन केलेल्यांना नवीन साईटवर नव्यानं जॉईन व्हावं लागेल ( अर्थात, त्यांची इच्छा असल्यास ). जुन्या जागेवर काही गंबतजंबत प्रकार करायची इच्छा आहे. बघू कसंकाय जमतंय ते !!

सध्या तरी मुक्ताफळं दोन्हीकडून उधळत असतील. काही बदलही दिसतील. पोस्टगणिक दिसणारं रेटिंग आणि लाईक डिसलाईक विजेट. गूगल बझ सोबत स्थापन केलेलं संगनमत (नको, बरा शब्द सापडेपर्यंत इंटिग्रेशन ठीक आहे ), इत्यादी इत्यादी आणि बरंच काही. हे गूगल बझ आणि ब्लॉगचं इंटिग्रेशन हा फार छान प्रकार आहे. तुमची पोस्ट गूगल बझवर जाऊन पडते आणि तिथे तुमच्या मित्रमंडळींनी केलेल्या कॉमेंट्स येऊन पडतात तुमच्या ब्लॉगवर. (आहे किनाई जंबत !! :D ) वर्डप्रेस वापरणार्यांसाठी मी लवकरच याबद्दलची पोस्ट टाकायचा प्रयत्न करेन.

तोपर्यंत,

आपला, (संगणककिडा)

नॅकोबा

2 thoughts on “ब्लॉगचा पत्ता बदलतोय, मुक्ताफळे डॉट कॉम !

  1. अभिनंदन. बरं झालं फार लवकर निर्णय घेतला. एकदा ब्लॉगची रॅंकींग वाढली की मग अशा तर्हेने कर्व्हर्ट केलं तर गुगल रॅंकींग जातं!!
    शुभेच्छा.

  2. खरंय, एकदा का ऑनलाईन लिंक्सची संख्या वाढत गेली की मग डोमेन बदलताना शंभरशेसाठ गोष्टींची काळजी घेत बसावी लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>