अगदीचफारविचारकरायचाम्हणलंतरतुम्हालालक्षातयेईलकीदोनशब्दांतअंतरसोडणंहेशब्दांसाठीआणित्यांच्याअर्थांसाठीअत्यंतआवश्यकअसतंभाषेचाहाशुद्धनियमआपणजरमनुष्यवर्गावरलागूकरूनपाहिलातरआपल्यालाजाणवेलकीमाणसंहीशब्दांसारखीचअसतातत्यांनाहीइतरांपासूनएकविशिष्टअंतरलागतंजेणेकरूनत्यांनास्वतःचंअसंएकअस्तित्वमिळतंआणित्याअस्तित्वालाहीएकअर्थप्राप्तहोतोनाहीतचालूराहतेतीकेवळएककेविलवाणीधडपडरसर्वसमावेशकअशाएकाचनिरर्थकअस्तित्वाच्यागिचमीडीतूनस्वतःचाअर्थटिकवूनठेवण्याचीपणशब्दहीएकसमूहचएकापाठोपाठमांडलेल्यास्वरआणिव्यंजनांचाशब्दांनात्यांचंस्वतंत्रअस्तित्वहेहवंचपणएकटाकोणीचनाहीअगदीएकलकोंडा “तू”, “मी” आणि “तो” सुद्धा !
Author Archives: नॅकोबा
दीपावलीच्या किंचित उशिरा पण हार्दिक शुभेच्छा !!
ही दिवाळी तुम्हाला, तुमच्या परिवाराला अन् मित्रमंडळींना सुखसमाधानाची, समृद्धीची, भरभराटीची, यापैकी एक, यापैकी सर्वं, आणि तुम्हाला हवी तशी जावो ही मनापासून सदिच्छा.फक्त दिवाळीच काय, पुढचं वर्ष अन् त्यापुढचीही अनेक वर्षं तशीच जावोत.
शिवाय माझ्या फेवरेट शुभेच्छा आहेतच !!
मे द फोर्स बी विथ यू !
लिव लॉंग अॅण्ड प्रॉस्पर !
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी !
विंगार्डियम लेविओस्सा !!
~नॅकोबा !
म्याव
असंच आपलं उगाच जरा म्याव करावंसं वाटलं. ब्लॉगवर बरेच दिवस शुकशुकाट होता. आठवडाभर काम जरा जास्त झालं की शनिवार रविवारची वामकुक्षी जरा जास्तच लांबते (अन् लवकरही सुरू होते ) आणि तिची ग्लानी तासन् तास तशीच टवटवीत राहते.असो.सध्या कामातून वेळ मिळाला तर ब्लॉगसाठी विचार करत न बसता ( एरवी मी विचार करून टंकतो असं नाही, तरीही ) सरळ स्टारक्राफ्ट-२ खेळत असतो. ऑनलाईन, मल्टिप्लेअर.
बरेच महिन्यांनी, बहुतेक अख्ख्या वर्षानंतर एक रिअलटाईम स्ट्रॅटेजी गेम मल्टिप्लेअर खेळताना मस्तं वाटतं. त्यात हा स्टारक्राफ्ट. ब्लिझार्ड एंटरटेनमंटची निर्मिती.ब्लिझार्डचे गेम्स “बाप” असतात. वॉरक्राफ्ट, स्टारक्राफ्ट अन् डिआब्लो या तीन गेम्सच्या नावांपलिकडे ब्लिझार्डचं काहीच नाही पण या तीनही नावांमागे लाखो चाहत्यांची फौज आहे. या गेम्सच्या पहिल्या आवृत्त्या येऊन अक्षरशः तप लोटलं तरीही यांच्या नवीन आवृत्त्यांबद्दल आजही पराकोटीची उत्सुकता चाहत्यांत दाटून आहे. फार लांब कशाला जा, खुद्द मीदेखील डियाब्लोचा टीशर्ट घालून त्याच्या तिसऱ्या आवृत्तीकडे डोळे लावून बसलोय.

मुद्दामच जरा हाललेला फोटो टाकलाय, मधे अख्खा फोटो फेसबुकावर लावला तर गेमरेतर लोकांना मुद्द्याचं सोडून फक्त वाढलेली जाडी दिसली...
आज इतकंच. आता मी दिवे मालवून मेणबत्त्यांच्या मिणमिण प्रकाशात रॉक ऐकत निवांत बसणार. कोक पीत. (ढेकर)
गुडनाईट !
बकुळीची फुलं
“हे बघून तू वेडा होणारेस!!!” सॅकमधून पाचपंचवीस सीड्यांचे दोन मनोरे बाहेर काढत स्वप्नील.
“भेंडी !!!! चिन्याचं कलेक्शन????? कडक !!!!!!” केतनचा गेम पॉझ.
“हाहा. काल काकूंनी यातून डीडीएलजे ऑलमोस्ट लावलाच होता. चिन्या पण हुशार! सीडी बाहेर ठेवली होती काढून!!!”
“हाहाहा, घोडा !”
“बेक्कार घोडा !!! फक्त पीसीवरच चालतो म्हणून कसंबसं कटवलं त्यानं. रिस्की आहे म्हणतो आता घरी ठेवणं. ”
“कूल” केतन परत खेळाकडे. “पाच मिनिटात उठवतो याला, शेवटचा राहिलाय, चिंधीगिरी करत लपून बसलाय कुठेतरी”
“ही पाहिल्येस का?” स्वप्नीलच्या हातात उभी चकती, चेहेऱ्यावरील भाव अवर्णनीय.
“अं?” गेमवरचं लक्ष साधारण अर्धा सेकंद विचलित. एक कटाक्ष. “हं” दुसरा कटाक्ष, यावेळी दीड सेकंद. “हो. अरेबिअन नाईट्स स्टार्ट !” पुन्हा गेमकडे.
“ही??”
“अं… हो” यावेळी आवलोकनासाठी दोन पू्र्ण सेकंद. किंचित वैताग “चिन्याचं ऑलमोस्ट सगळं कलेक्षन पाहिलंय, जुनं आहे.”
“आईला, लोण्याची सीडी ! हिचाच किस्सा झालेला नं?”
“हो, तुला माहीत नाही” उत्तराची वाट न बघता “हाहा, अल्टिमेट किस्सा. बघता बघता दिवे गेले. नंतर संध्याकाळी क्लासनंतर आम्ही त्याच्याघरी गेलो तर काका फुल मिशीतल्या मिशीत हसत होते. त्याला सुमडीत म्हणाले. आपल्याकडे एकच कॉम्प्युटर आहे, आणि आई ताईही तोच वापरतात, तर जरा जपून… कसं? ” केतन, गेमपासून एक लक्ष कणभरही विचलित होऊ न देता.
“मग??” हातातलं काम सध्या थांबलेलं.
“मग लोण्या फुल्ल कव्हर करायला लागला. काय म्हणताय बाबा, काही माहितीच नाही वगैरे. फुल पळापळ झालेली त्याची. तर त्याचे बाबा सुरूच झाले… ‘एकदा ना दोन उश्या असतात’ !!! आईश्शप्पथ अरे. त्याची सुरूवात आहे तशी. लोण्या गारच पडला ! मीपण नंतर बरेच दिवस च्यायला बघायचोच नाही काकांकडे. शेजारी उभा होतो अरे मी हा अख्खा डायलॉग झाला तेव्हा. बेक्कार ऑकवर्ड च्यायला!!”
थोडा वेळ शांतता, एकीकडे गेम चालू, दुसरीकडे सीड्या चाळणं सुरू. शाळकरी दप्तर घेऊन केतनचा धाकटा भाऊ आत. “आईssल्ला, नवीन गेम्स ???”
“नाही रे, कॉलेज प्रोजेक्टचं काम आहे.” केतन, लक्ष अविचलित
“प्रोजेक्ट” स्वप्निल… सीड्या पुन्हा मनोऱ्यांमधे डकवून सॅककडे रवाना.
—– इति. —-
नॅकोबा !
बदामाच्या पिठाच्या कुकीज्
साधारण महिन्याभरापूर्वी या प्रकाराचं वर्णन केलं होतं पण फोटो काढण्याआधीच हा पदार्थ मटकावण्यात आला होता. आज पुन्हा आणला आणि लगेच फोटो काढून इकडे टाकला.
याची निर्मिती केवळ बदाम पीठ, साखर, अंडं आणि पिस्ता इतकंच वापरून झाल्ये असं त्या खोक्यावरच्या पट्टीचं म्हणणं आहे, काही का असेना, या कुकीज चहाबरोबर मस्त लागतात (बुडवूनही, पण न बुडवता जास्त).
गोवऱ्या
गोवऱ्या. वाळलेलं शेण. जळणास उपयुक्त जमीन सारवण्यासाठी सुद्धा. चुलीसाठी, इंधनासाठी वगैरे. उर्जा, उब. शेण, गायीपासून मिळणारं.
इथे एक फार महत्वाचा धडा आहे, शिकण्यासारखा.
धूर्त नेतेमंडळी बहुदा याचं बाळकडूच घेऊन आलेली असतात.
Wait for something that’s religious and sacred to come up with some bullshit.
Spread some of it around, keep some out for drying.
Later on, burn that dried up bullshit whenever required and enjoy the cozy warmth of the fumes.
जमली तर आपली पोळीही भाजून घ्या त्यातच.
Keep feeding the same religious and sacred thing,
just to ensure that you maintain your permanent supply of bullshit.
धप्प !!
गुरुत्वाकर्षण…
सिंप्ली पुट युसी… यव्रीथिंग धॅट ह्याझ मास, अट्र्यॅक्ट्स यव्रीथिंग यल्स धॅट ह्याझ मास.
आपल्या पॅन्क्रीयाज या गाण्यात वीअर्ड अॅल यांकोविक म्हणतो :
“माय पॅन्क्रियाज अॅट्रॅक्ट एव्री अदर पॅन्क्रियाज विथ अ फोर्स
प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस
अॅण्ड इन्वर्सली प्रपोर्शनल टु द डिस्टन्स बिट्वीन देम”
एरवी सुमडीत असणारी ही शक्ती तुम्ही धडपडल्यावर मात्र अगदी वाट्टेल तिथे कार्यभाग साधते. स्थिती, गती, काळ अन् बळ वगैरे मंडळींची गणितं अचानक कार्यन्वित होतात अन् नको नको त्या भागाकारावर गुणाकार करून कपाळी आठ्या आणतात…..
परवा असंच झालं.
मी ऑफिसमधून बाहेर पडलो. शुक्रवार संध्याकाळची वेळ होती. मी आनंदात होतो. (पण आनंद गगनात मावत नव्हता) सायकल काढली. गेले साडेतीन महिने सलग सायकलने ऑफिसात येतोय याचा उगाचच अभिमान वाटला. कुलूप काढून मस्तपैकी सायकलवर स्वार झालो अन् घराच्या दिशेने कूच केलं . ऑफिसच्या मागूनच एक पायवाट जाते. ती वाट शेजारची इमारत ओलांडून पलिकडच्या इमारतीच्या पार्किंग लॉटमधून बाहेर पडते. मीही तिच्याबरोबरच बाहेर पडलो. संध्याकाळी या लॉटमधे जेमतेम दोनचारच वाहने असतात. या माहितीची खरंतर काहीच गरज नाहीये पण सुचतंय म्हणून लिहून मोकळा होतोय.
तर पार्किंग लॉट. याच्या दुसऱ्या बाजूनं एक साईडवॉक (पदपथ, फूटपाथ वगैरे) आहे. त्यावरून थोडं पुढे गेलं की सायकल रस्त्यावर आणता येते. खरं तर सरळ ऑफिससमोरच्या रस्त्यावरून सायकल हाकत पुढे डावीकडे वळून याच रस्त्यावर येता येतं, पण तो रस्ता प्रचंड रहदारीचा असतो, शिवाय मागच्या पाऊलवाटेवर कधीकधी मांजर बसलेलं दिसतं म्हणून मी मागचीच वाट पकडतो. लॉटमधून साईडवॉकवर यायची ही वाट अत्यंत अरुंद आहे. बारीक आहे म्हणलात तरी हरकत नाही. महामार्ग आहे म्हणलात तरी माझी काय हरकत असणारे म्हणा.
तर असा हा लॉट पार करता करता आज घरी गेल्यावर काय करावं या विवंचनेत माझं मन गुंतलं होतं. (थोडक्यात, रस्त्यावर लक्ष नव्हतं…) त्याच गहन विचाराच (नादात) मी या चिंचोळ्या वाटेवर आलो खरा, पण वाट संपता संपता माझी मात्र पार वाट लागली.
त्याचं काय झालं… की वाटेवरून वळता वळता सायकलचं पुढचं चाक त्या चिंचोळ्या वाटेच्या कडेला असलेल्या इन मीन दोन इंच उंड कठड्यावर आपटून थांबलं. मागचं चाक मागच्यामागं उचललं गेलं. एरव्ही जर मी शहाण्यासारखा सिटावर बसून सायकल दामटत असतो तर आजवरच्या कुक्कुटसेवनाने प्राप्त झालेल्या शारिरिक क्षमतेने (यालाच वजन असेही म्हणतात) ते आपसूक खाली आलं असतं. पण माज !!! मी अक्षरशः हॅंडलवर रेलून होतो.
आता जे घडलं ते घडायला सेकंदही लागलं नसेल. मागचं चाक वर आलं. अचानक माझं संपूर्ण वजन हॅंडलवर आल्यानं ते पुढे झुकलं, मागचं चाक आणखी वर. शिवाय वळण्याची प्रक्रिया सुरू असल्यानं एकूण सामुग्री डावीकडे कलू लागली… हात हॅंडलवरून सुटले, गुडघे हॅंडलच्या दिशेनं झेपावले, जमीन माझ्या दिशेनं येऊ लागली अन्
अन् मी पडलो. धप्प्.
सायकल टुणटुणीत, मी किंचित मुक्यामारावर निभावलो. सात-आठ वर्षांपूर्वी सवयीचा असलेला तो अनुभव परत अनुभवताना मात्र एक वेगळाच आनंद जाणवला. धडपडून झाल्यावर पहिल्यांदाच माझ्या चेहऱ्यावर हसू होतं.
गुरुत्वाकर्षण नावाला. मला ते गाणं टाकायला कारण हवं होतं
~नॅकोबा !!
अनाचरटीय असुचेतन ब्ळॅ
सध्या. पोष्टीची सुरुवात सध्या नी केली की रटाळ अन् कंटाळवाणं बरंच काय काय सध्याच्या नावाखाली खपवता येतं. (इथे वाचा)
ब्लॉग सुरू करून आता दोन वर्षे होतील. ब्लॉगवर आचरटपणा सुरू करूनही आता जवळजवळ सहा महिने लोटलेत. पण कुठेतरी पाणी मुरतंय. वैचारिक शुष्कता आली आहे. पानगळीच्या हंगामात (त.टी.१) विचारवल्लीची जीर्णपर्णे प्रतिभालतिकेशी संलग्न राहण्याचा एक कृष, असहाय प्रयत्न करून अखेर दिनचक्राच्या वैचारिक अग्नेय मोसमी वाऱ्यांबरोबर फडफड… फडफड… करत उडून जातात. असंख्यातून बचावून एखादं जीर्णपर्ण अनंत मैलांचा वैचारिक प्रवास करत असेलही कदाचित, पण त्याची सुरसिक मेंदूशी असलेली अमूर्त नाळ केव्हाच तुटलेली असते. इतकंच काय…. मज्जारज्जूंनाही हल्ली मज्जा कळत नाही. अन् मी दारूही पीत नाही.
सर्दी मे पसीना गले ना भूक ना प्यास लगे, क्या यही प्यार तो नही? असेलही कदाचित, मला माहीत नाही, (तुम डॅडी से पूछ लेना.) पण उपरिनिर्दिष्टित(त.टी.२) परिच्छेदात ( सभ्य नसाल तर त.टी.३ वाचा ) उल्लेखलेली लक्षणे मात्र तिसरीकडेच अंगुलीनिर्देश करतात. (त.टी.५) याला ब्ळॅ स्थिती असं म्हणतात. ब्ळॅ या शब्दाला अर्थ जितका अर्थ आहे त्यापेक्शा अंमळ कमी अर्थ या अवस्थेला आहे. इथे गोष्टी आपोआप सुचत नाहीत. सुचल्या तरी टिकत नाहीत. टिकले तरी ते टंकायचा कंटाळा आलेला असतो त्यामुळे असंख्य पोष्टी अशाच अटंक्यावस्थेत विरून जातात. यालाच ब्ळॅ असेही म्हणतात.
तरीपण,
मांजरं मात्र मऊ असतात. अन् ती तशी आहेत तोवर आपल्याला काळजीचं कारण नाही.
तळटीपा :
1. हंगाम म्हणलं की नेमका भाद्रपदच आठवतो राव…. काहीतरी केलं पाहिजे…
2. उपरिनिर्दिष्टित – कणेकर या शब्दाला शिंचा असे संबोधतात. मी सहमत आहे. शिंचा म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही पण शिवी वापरताना तिचा अर्थ माहीत असणं शिवीदेयकावर बंधनकारक नाही पण उच्चार अन् आवाजाचे चढउतार बरोबरच आले पाहिजेत. त्याला पर्याय नाही. खालील उदाहरण विचारात घेणे.
3. परिच्छेद हा शब्द असाही वापरता येईल : तुझ्या **** च्या ****त परिच्छेद !!!! इथे परिच्छेद या एरव्ही निरूपद्रवी शब्दाच्या सहाय्याने अत्यंत हिंसक परिणाम साधता येतील. या शब्दात योगायोगाने ‘द्’ अन् ‘च्’ ही व्यंजने येतात त्यामुळे शब्दाच्या मूळ अर्थाशी अनभिज्ञ असणाऱ्या श्रोत्यांवर वरील वाक्प्रयोगाचे परिणाम अत्यंत तीव्र भासतील.
४. ही तळटीप वर कुठेही वापरलेली नाही. पण लिहिली नसती तर हिच्यावर अन्याय केल्याचा आरोप माझ्यावर आला असता.
५. असे म्हणतात की इतरांकडे बोट दाखवताना चार बोटं स्वतःकडे असतात.अंगुलिनिर्देशाच्या एका उपपद्धतीत मात्र मध्यगा नभाकडे तर उर्वरित बोटे वसुंधरेकडे निर्देश करीत असतात.
अॅर्नॉल्ड पामर
आईस टी अन् थंडगार लेमोनेड ( लिंबू की मुसुंब की इडलिंबाचं गोड्डड्डड्ड सरबत ) यांचं एक अत्यंत चविष्ट मिश्रण. यालाच अॅर्नॉल्ड पामर असेही म्हणतात. विकिपीडियावर “ए आर एन ओ एल डी स्पेस पी ए एल एम ई आर शिफ्ट ९ डी आर आय एन के एस शिफ्ट ० ” असा शोध घ्या, मी काय म्हणतोय ते कळेल.
एरवी कैक बाटल्या आईस टी पिणाऱ्या लीडने आज “कोणी शेअर करणार का?” असं विचारलं तेव्हा मी “हा माणूस तर ठणठणीत दिसतोय, एकदम असं काय झालं” नजरेनं पहातच हो म्हणलं. थंडगार चहाची अर्धी बाटली माझ्या कपात रिकामी झाल्यावर मग त्या रहस्यमय वागणुकीचा उलगडा झाला. अर्धी बाटली लेमोनेडनं पूर्ण भरली जाताच मीसुद्धा कप पुढे केला. आहाहा ! आनंद !!!
काही जण लेमोनेड ऐवजी संत्र्याचा रस देखील वापरतात. यातच व्होडका मिसळली की “जॉन डेली” तयार!! पण प्रॉब्लेम एवढाच ही मी दारू पीत नाही. तुम्ही कधी ट्राय केलंतच तर मला चव नक्की सांगा.
आवरावर आज एक बातमीचं कात्रण होतं. तरुणां…
आवरावर आज एक बातमीचं कात्रण होतं. तरुणांनी राजकारणात यावे या बातमीच्या मधोमध “ध्रुवने रोखली पोलिसांवरच बंदूक” या शिर्षकाची एक बातमी होती. विनोदांमधे असलं काही सापडलं की त्यावर मी डायरेक्ट विश्वास ठेवत नाही. कोणत्या वर्तमानपत्राने वेबसाईटवर अशी बातमी टाकल्ये का याची खात्री करावी म्हणून “बंदूक रोखली” गूगल शोध मारला अन् येऊन पोहोचलो ते http://balsanskar.com/marathi/lekh/323.html या गोष्टीवर येऊन पोहोचलो. शिरीषकुमारची गोष्ट, लहानपणी ऐकलेली. प्रभात फेरीवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांसमोर उभं राहून “हिंमत असेल तर माझ्यावर गोळी चालवा” हे आठवीत शिकणाऱ्या शिरिषकुमारने काढलेले उद्गार. अन् आज आवरावर वाचलेली ती बातमी. केवढी तफावत !! अन् ती बातमी अगदी फोटोशॉपची कमाल गाजवून आवराकरांनी निर्माण केली असेल तरी ती खरी वाटण्याइतकी परिस्थिती आज अस्तित्वात आहे.
अवघड आहे.







