हीच ती जागा जिकडे मी स्वतःवर प्रयोग करून बघतो. आधी काहीही जमायचं नाही, आता निदान भात तरी करता येतो. अगदी गेल्या पंधरा दिवसांपर्यंत मी माझ्या हातचं खाणं झालं की झोपताना पाचक घेऊन झोपायचो… उगाच का रिस्क घ्या… आता भात जमतो आणि उकडलेल्या अंड्याचा एक पदार्थ ज्याला मी अंडाकरी समजून खातो.
हा माझा चहाचा साठा. साधा चहा, मसाला चहा, मॅंगो चहा, हिरवा आणि मिंट चहा. साध्या चहाने दिवस मस्त जातो आणि रात्री गरमागरम हिरव्या चहाने मस्त शांत शांत वाटते. काही प्यायलं तरी आजीच्या हातच्या चहाची मात्र रोज आठवण येते…
आज इतकंच… आणि हा एक “उगाच” फोटो…
आपला,
~नॅकोबा



नॅकोबा..फ़ोटो टाकायची आयडिया छानच आहे…रात्री झोपताना हिरव्यामधल्या लॅव्हेंडर फ़्लेवर असेल तर पी असं एक माझी चिंकु कलीग सांगायची…ती दिवसभर खा खा खायची आणि ते पण सगळ चायनीज तळण आणि कुठले कुठले हिरवे चहा ढोसायची..आणि तरी ती आपली बारीक राहायची..आम्ही तिच्यातलं खाऊन चांगलेच धष्टपुष्ट झालो होतो…:)
हो ना… यांच्याकडे सदैव कोणते ना कोणतेतरी हिरवे चहा असतात.
मला हिरव्या चहाची सवय माझ्या चीनी टीम लीडनेच लावली [:P]