काय झालं?
बाळ रडत होतं…
थोडं स्पिरिट द्यायला सांग तिला… तू लहान असताना मी ही तुला हेच देत होते !!!
हे असंच काहीसं झालं असणार आमच्या बाबतीत. आमचं रक्त आणि आमचं स्पिरिट, हल्ली जरा कळेनासंच झालंय. मिडियावाले, नेते सारखं सांगतात, आमचं स्पिरिट हे, आमचं स्पिरिट ते, स्पिरिट लय भारी राव, कमाल आहे ! सलाम !! टाळ्या !!! खच्चून भरलोय स्पिरिटनी आम्ही.
एरवी असलं काहि लिहिलं नसतं पण आज जरा माझं स्पिरिट खवळलंय…
रक्त वाहतं आमचं पण दाद स्पिरिटला मिळते…
स्फोट होतात, लोक मरतात, खून पडतात, बलात्कार होतात, अपराधी निरपराध सुटतात किंवा फराळ झोडत बसतात… आम्ही मात्र थंड… स्पिरिट तसं गारगार असतं ना !!!
आम्ही स्पिरिटवर जगणारे, त्यामुळे आमचं रक्त वाहिलं तरी आमच्या नेत्यांना खात्री असते, आम्ही जगू याची.
दहशतवादी, भ्रष्ट नेते, गुंड, बलात्कारी यांचं बरं असतं. स्पिरीट नाही हे कृतीतूनच दिसतं यांच्या. म्हणून यांना मारवत नाही, कारण आम्हाला रक्तपात मान्य नाही.
प्रयोगशाळेतले स्पिरिटचे दिवे आहोत आम्ही. आम्ही जळतो पण त्यात आगीची धग नसते… कोणीही यावं, किल्ली फिरवून विझवून टाकावं .
असं नव्हतं हो आमचं स्पिरिट.
त्यातला प्रक्षोभ, विखारी दाहकता हे आरडाओरड मीडिया आणि नेतेमंडळींनी नेलं… आम्हाला उरली अपरिहार्यता.
वास्तवाच्या सुया टोचू नयेत म्हणून आम्ही बहुतेक हे स्पिरिट चोपडूनच चालतो .
आमचं स्पिरिट आम्हाला वेदनांपासून दूर ठेवतं हो पण आता संवेदनाच नाहीशा करेल की काय अशी शंका येत्ये…
जबरदस्त !! एकदम मस्त आणि वेगळं लिहिलं आहेस !!
एकदम वेगळंच स्पिरीट दिसतंय या पोस्टमध्ये
हेरंब, अपर्णा धन्यवाद.
लिहिलेलं वाचलं गेलं आणि ते चार लोकांना आवडलं यातच ब्लॉगचं ब्लॉगपण साध्य झालं
छान लिहिले आहे
Funny is better!