काल रसोई मॅजिकचा मिसळ रस्सा मिक्स वापरून मिसळ केली. बरं वाटलं. त्याआधीच्या रविवारी पोह्यांचा प्रयत्न सपशेल फसल्यामुळे गेल्या आठवड्यात स्वयंपाकाचा शून्य उत्साह होता. अखेर शनिवारी बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळा आला आणि मिक्सचं पाकीट उघडलं.
पसरट भांड्यात (माझ्याकडे फक्त पसरटच भांडी आहेत म्हणून पसरट) तेल गरम करून त्यात मोहरी तडतडवता आली की झालं. त्यातच चिरलेला एक टॉमॅटो टाकायला, एक कप पाण्यात एकत्र केलेलं मिक्स घातलं. दोन मिनिटं गरम केलं. मिसळ रस्सा तयार. मग साधारण गरम केलेले पाव एका ताटलीत घेऊन मस्तपैकी फन्ना उडवला. तृप्तीची ढेकर मात्र दिली नाही. एकतर मला ढेकर येत नाही. आणि तृप्तीची ढेकर मी दिली तर तृप्ती काय देणार हा प्रश्न उरतोच !
असो.
मांजर मऊ असेपर्यंत चिंतेचं कारण नाही.
मिसळ आणि पाव…वॉव….(जोपर्यंत एखाद्या डिशसाठी चपाती मस्ट नसते तोवर मी त्याची फ़ॅन…:))
तृप्तीची ढेकर मी दिली तर तृप्ती काय देणार..हा हा हा..भन्नाट….रसोई मॅजिकला पकलास की परंपरा नंतर बाकीच्या कंपन्या सगळ्यांना संधी दे….Good luck..
प्रयंत्नांती परमेश्वर!! मी नेहेमी म्हणतो, खेड्यामधली, अजिबात न शिकलेली स्त्री पण स्वयंपाक करु शकते , तर आपण का नाही? प्रयत्न करत रहा.. यश कधी ना कधी तरी मिळेलच!! बेस्ट लक!
heheheheheheh..
nehami pramane bharee..
तृप्तीची ढेकर मी दिली तर तृप्ती काय देणार हा प्रश्न उरतोच !
LOL LOL LOL..
स्वयंपाकीय इतिहास असाच असतो. एक प्रयत्न फसल्यावर पुन्हा तो रसोईचा डोंगर चढणं दुसरा कुठला तरी कंटाळा आल्याखेरीज होत नाही!
पण सगळ्या प्रकारच्या कंटाळ्यावर मिसळ हा रामबाण उपाय आहे! त्या चमचमीत तिखट आठवणीनेही केवढा उत्साह येतो! (खायचा उत्साह! करण्याविषयी हे लागू होत नाही.)
तृप्तीची ढेकर वरच्या ज्यांना ज्यांना आवडली, त्यांच्या तोंडात मिसळ पाव पडो!
मांजर भलतीच मऊ आहे….मिसळ खाऊन मी आणि दूध उडवून ती आता सुस्तपणे पसरणार आहोत….
(ही पोष्ट अर्धी वचून आधे मी दुर्गेची मिसळ खायला गेले…मग येऊन कॉमेंट बिमेंट!!)
स्वयंपाकीय इतिहास असाच असतो. एक प्रयत्न फसल्यावर पुन्हा तो रसोईचा डोंगर चढणं दुसरा कुठला तरी कंटाळा आल्याखेरीज होत नाही! – अनुज्ञा
खेड्यामधली, अजिबात न शिकलेली स्त्री पण स्वयंपाक करु शकते , तर आपण का नाही? – महेंद्र
जोपर्यंत एखाद्या डिशसाठी चपाती मस्ट नसते तोवर मी त्याची फ़ॅन…:) – अपर्णा
वरील तीन्ही वाक्यांना अगदी शंभर टक्के अनुमोदन आणि सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद.