मांजर इतकं मऊ का असतं?

मांजर मऊ असतं का?
मांजर हा उपद्रव ठरू शकतं का?
उपद्रवी मांजरावर उतारा म्हणून मालकाने कोणता द्रव घ्यावा?
द्रवाचा अंमल जाणवत असताना मांजर मधे आल्यास काय होईल?
तुम्ही मांजर पाळाल का?
तुम्ही आजून काय काय पाळाल ? (कुत्रा, ससा, कायदा, सिग्नल वगैरे…)
घरच्या मांजराचं महत्व किती?
कोणी एक धनू जर तिच्या घरधन्याने धावून धावून जमवलेल्या धनापैकी निम्मं धन घरच्या बन्या बोक्याच्या सुशोभितीकरणास खर्च करत असेल तर ते योग्य की अयोग्य?
हा धनी जर धनूच्या ताटाखालचं मांजर असेल तर परिस्थितीत काय फरक पडेल ?
धन्या आणि बन्यापैकी कोणत्या मांजराचा मालकिणीवर जास्त अधिकार असेल?
लग्नानंतर मुलीबरोबर तिचं पाळीव मांजर सासरी जाउ शकतं का?
तेव्हा त्या मांजराचं नाव बदलण्याबद्दल तुमची मतं काय?
व्याहीभोजनात मांजराची जागा कुठे?
हे आणि यासारखे बरेच प्रश्न मला उगाच पडतात…
काही दिवसांपूर्वी एके कम्युनिटिवर हा टॉपिक टाकला होता. काळाच्या ओघात तो उडाला. बरेच दिवस तो ईमेलमधे टिकून होता, आज म्हणलं इकडे टाकावा. तेवढीच थोडी मज्जा !
आपला,
~नॅकोबा


Kahitarich…pan Ulti ..yar tuze post vachayla hatke astata..maja yete vachayla…
सागर, धन्यवाद.
रच्याक (मराठी BTW, सौजन्य : हेरंब #)
वरचं “काळाच्या ओघात तो उडाला” हे वाक्य “तो तीन तासांत उडाला” असं वाचावं.
तो तीन तासांत उडाला
त्या आधी खूप कॅफे झाला होता.
आणि ३ तसात जवळपास ३०० पोस्ट म्हणजे खूपच झाल ना?
hehehe..
meawooooo
Awadala khupach
नॅकोबा, ‘रच्याक’ चं खरं श्रेय माझ्या या ब्लॉगर/मायबोलीकर मित्राचं आहे. ऋयाम त्याचं नाव.
http://www.blogger.com/profile/13030371353884807329
@अनिकेत : हो, पण त्या तीन तासात अशक्य मजा आली होती
लग्नानंतर मुलीबरोबर तिचं पाळीव मांजर सासरी जाउ शकतं का? …..hee hee hee…प्रश्न ाशक्य गहन
meow meow..!!!