मला बोर होतंय…
बोर गोड असतं…
साखर पण गोड असते…
साखर पांढरी असते…
ससाही पांढरा असतो…
ससा मऊ असतो…
मांजर पण मऊ असतं…
मला मांजर आवडतं…
पण मला बोर होतंय !
मला बोर होतंय…
बोर गोड असतं…
साखर पण गोड असते…
साखर पांढरी असते…
ससाही पांढरा असतो…
ससा मऊ असतो…
मांजर पण मऊ असतं…
मला मांजर आवडतं…
पण मला बोर होतंय !
कॉमेंट्स चालतायत का ते बघतोय…
नॅकोबा म्हणजे काय? नाव छान आहे….आणि ब्लॉग भारी आहे…
@ अनुज्ञा : आपल्या अभिप्रायाबाबत आभारी आहे.
मी नचिकेत, त्या नावाचं आंग्लाळलेलं रूप नॅक. अशा आंग्लाळलेल्या माझा परत एकदा मराठीकडे वळायचा हा प्रयत्न म्हणून नॅकोबा. शिवाय बोका हा माझा आवडता प्राणी. नॅकोबा बोकोबाच्या खूप जवळ गेल्यासारखं वाटतं. मऊमऊ वाटतं अगदी
नॅकोबा बोकोबाच्या खूप जवळ गेल्यासारखं वाटतं..ha ha ha….
खूपच छान नॅक-बोकोबा! ब्लॉग सिंपली अफलातून आहे. सगळ्या पोष्टांवर कॉमेंट लिहायला बोर होतं म्हणून लिहित नाहिये! नाहीतर बाकी सगळी कामं सोडून कॉमेंटीच लिहाव्या लागतील!
नॅकोबा नाव खरंच मऊमऊ वाटतं! माझा पाळलेला बोकोबा पण ब्लॉगवर खूश झाला असता…पण त्याला अजून ई-गोष्टी वाचता येत नाहीत. पण तसा तो पु्स्तकं नीट चावून फाडून खातो!!
>>> माझा पाळलेला बोकोबा < << सहीच !!! ( ज्यलन... )

>>> नॅकोबा नाव खरंच मऊमऊ वाटतं! < << थांकू, थांकू
म्यू