बिनबुडाचं विधान,
विधान सभा,
सभा त्याग,
त्यागाचं मार्केटिंग,
मार्केटिंग चेन,
चेन स्मोकिंग,
स्मोकिंग हॉट्
बिनबुडाचं विधान,
घागरी बूड,
खीर नाही खाल्ली,
पण खाणार खार,
खारीचा वाटा,
लाटणार साप
फाशांचं दान
शिडीला ताप
बिनबुडाचं विधान
बुडाला पाय
बुडत्याला काठी
आधाराला खांब
खांबात देव
देवाची शप्पथ
विधीलिखित
काय आहे काय हे बाबा..
भलताच सुटला आहेस की..
इन्टरेस्टिंग आहे..
याला सर्वस्वी गुरुवार संध्याकाळ जबाबदार आहे. गुरुवार संध्याकाळ ही एक अशी वेळ आहे की तेव्हा वाटेल ते सुचू शकतं.