साधारण महिन्याभरापूर्वी या प्रकाराचं वर्णन केलं होतं पण फोटो काढण्याआधीच हा पदार्थ मटकावण्यात आला होता. आज पुन्हा आणला आणि लगेच फोटो काढून इकडे टाकला.
याची निर्मिती केवळ बदाम पीठ, साखर, अंडं आणि पिस्ता इतकंच वापरून झाल्ये असं त्या खोक्यावरच्या पट्टीचं म्हणणं आहे, काही का असेना, या कुकीज चहाबरोबर मस्त लागतात (बुडवूनही, पण न बुडवता जास्त).



अतिरिक्त चटावून सोडणारी पोस्ट.. निषेध.
कृपया असल्या वाईट पोस्ट परत पाठवू नयेत त्यामुले लोकांना फार वाईट वाटते याबद्दल बोकोबान्ना(नकोबन्ना )जाणीव नसावी.तरी पुन्हा असा आगाऊ पणा करू नये.असे काही ददास करावायासे वाटल्यास प्रत्यक्ष SAMPAL देता येत असेल (फुकट आणि इच्छा असेपर्यंत ( खाण्यार्याची )) तरच , आणि तरच हे खपवून घेतले जाईल . अन्यथा पुन्हा असे काही दृष्टीस पडल्यास नकोबन्ना पुण्यात आल्यावर जबरदस्त शिक्षेस सामोरे जावे लागेल हे नीट लक्षात असूद्यात म्हणजे झालं.
कळावे लोभ असावा हि विनंती
आपले स्नेही