कधीकधी अचानक जोरात पोस्ट लागलीय असं वाटू लागतं पण तेव्हा नेमकं ऑफिसमधे किंवा बसमधे असल्याने बसता येत नाही. घरी येऊन निवांत बसावं म्हणलं तर तोवर पोस्ट सोयिस्करपणे जिरलेली असते… कधी बसल्यानंतर कळतं की फॉल्स आलार्म होता… थोडंसं लिहून तो ड्राफ्ट सेव होतो आणि कधीतरी आपण पूर्ण होऊ ही आशा धरून तशीच बसून राहते. अशा बऱ्याच जिरलेल्या किंवा विझलेल्या पोस्ट्सनंतर जेव्हा एखादी पोस्ट ब्लॉगचं मुखपृष्ठ पाहते तेव्हा बरं वाटतं. अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं… मन…
पोस्टसाठी एवढा विचार का करतो मी देव जाणे. विचार करून टाकण्यासाठी हे काय ऑफिसचं फॉर्मल मेल नाही… पण जेव्हा लिहीत असतो तेव्हा मनात असं काहीतरी होत असतं :
_____________________________________________________________________
आधी एक तर हौस (खाज) म्हणून ऊभारलेलं संकेतस्थळ (वेबसाईट म्हण ना… कशाला उगाच जड जड काहीतरी). शिकण्याच्या (किडे करण्याच्या) उद्देशाने त्यावर स्थापन (इन्स्टॉल… इन्स्टॉल…) केलेला ब्लॉग ( आता याला अनुदिनी वगैरे म्हणलास तर पोस्टचा ड्राफ्ट करून टाकीन…) तो ही मराठीत ! (जर महाराष्ट्र… बाबा लगीन !!!!) या ब्लॉगमागचा उद्देश असा, की मनात जे काही येईल ते लिहून मोकळं व्हावं, ( हं. ) मराठी टंकलेखनाची सवय व्हावी, ( हं. ) जरा चार गोष्टी नवीन शिकायला मिळाव्यात ( हं. ) आणि मांजरही मऊ असावं !!!
(आता कसं…
, तूच रे तूच… ब्लॉगला मुक्ताफळे म्हणतोस आणि नाकासमोर सरळ सरळ कसं लिहितोस??? कित्ती दिवस झाले आपण निरर्थक बोललो नाही. कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. वाक्याला मांजरासकट पूर्णविराम म्हणजे कसं अगदी गब्दुल झाल्यासारखं वाटतं.
, असं आवडतंय ते लिहावं ना गप. रोज काय घडलं, किती दिवस मांजर ब्लॉगवर आलं नव्हतं )
विषय भरकटतोय…
(त्यातच मजा आहे)
कसली ?
(ते कळत असतं तर अजून काय हवं होतं)
ड्राफ्ट करतोय मी हा पोस्ट…
(दुसरं जमतंय काय, निदान का ते कळू दे)
पोस्टवर असलं निरर्थक वाक्य कसलं अनप्रोफेशनल वाटतं…
(काय वाटतं?????)
अनप्रोफेशनल
( ब्लॉगसारखा ब्लॉग आहे, बास की… )
मजकूरही (कंटेंट)
!! मजकूर !! ही प्रोफेशनल
(कशाला ??)
…
(…)
पोस्ट कशाबद्दल होता?
(…)
ड्राफ्ट
(ड्राफ्ट)
_____________________________________________________________________
यालाच मराठीत प्रोक्रॅस्टिनेशन म्हणत असावेत. असो, मांजर मऊ असेपर्यंत फरक कोणाला पडतोय…
आपला,
नॅकोबा (म्हणजे मी)
काहीच्या काहीपण पण मस्त रे…