ब्लॉगच्या भेटींनी पाच हजारांचा टप्पा गाठला.
मनःबोका आनंदून गेला.
सुरुवातीला केवळ स्थानिक भाषेतलं संकेतस्थळ चालवण्याचं कुतूहल,
त्यानंतर मधून अधून मराठी अस्मितेबरोबर येणारा अभिमान,
नंतर साता समुद्रांपलिकडून सहज जोपासता येईल असं मराठीशी निर्माण झालेलं नातं
मिळालेला एक नवीन छंद. एक सुखद प्रवास!
मार्जारपुराण, निरर्थक बडबड, कधी आतलाच, नीट व्यक्त करता न येणारा विचार,
कधी चड्डी अन् प्रदेशाविषयीची साधकबाधक मतं,
आवडलेले सिनेमे, सिरीअली,
एखददुसरा अनुभव, कधी वैताग, वैफल्य चिडचिड,
कधी विचारांनीच चढलेल्या रात्रीची धुंद शब्दफेक
कधी नुसतीच पोष्ट. किंचित हसवणारी. कधी उगाचच विचारात ढकलणारी.
कधी डोक्याला खाद्य तर कधी नुसतंच डोकं खाणारी…
कधी उगाच मांजरासारखी… मऊ, स्वतःचेच लाड करणारी
[intlink id="170" type="category"]अर्थमैथुन[/intlink], [intlink id="396" type="post"]टमरेल[/intlink], [intlink id="327" type="post"]स्पिरिट[/intlink], [intlink id="421" type="post"]कोडचा किडा[/intlink], [intlink id="594" type="post"]सचिनचे क्लोन[/intlink],
[intlink id="209" type="post"]लिव इन रिलेशन[/intlink], [intlink id="384" type="post"]विचार[/intlink], [intlink id="292" type="post"]मांजर इतकं मऊ का असतं[/intlink] वगैरे,
आणखीही [intlink id="455" type="page"]बरंच काही[/intlink]
सार्थ अन् निरर्थक…
मुक्ताफळं, उधळलेली, चौफेर
तुम्ही वाचलीत, आनंदानं, आपुलकीनं अन् मला मित्र बनवून घेतलंत,
मनापासून, अगदी मनातल्या बोक्याच्याही मनापासून
सर्वांचे आभार,
शतशः, सहत्रशः आणि क्रमशः

Pingback: Tweets that mention पाच हजार | मुक्ताफळे -- Topsy.com
अभिनंदन….. लिहीत रहा!!!
अभिनन्दन आणि शुभेच्छा
अभिनंदन
Nakoba, tuze post amchyasathi nuste ‘posts’ rahile nasun, ata amchya daily routine cha ek bhag zale ahet. Ayushyakade eka veglya drushtikonatun baghayla lavnyachi takad ahe tyanchyat. Kadhi te potbhar hasavtat ani kadhi tachkan dolyat pani hee antat. Divas khup chan jato tyana bheto ki. Koni itaka asambaddha suddha chan lihu shakta, he tu dakhavun dilas
Asach lihit raha.. Amchya sathi… Khup khup abhinandan tuza ani tuza “Muktaphale” cha!
बापरे चंदा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन??? मी पोष्टींकडे त्या नजरेनं कधीच पाहिलं नव्हतं. असंबद्धतेतील असंबद्धता जाऊ न देता त्याला त्यातल्यात्यात अर्थपूर्ण करायचा प्रयत्न करतो मी आपला. पण असंही काही होऊ शकतं बघून छान वाटलं.