दर वीकेंडला नेटफ्लिक्सवर काहीतरी वेगळं आणि छान बघायला मिळतं. शुक्रवारी सायंकाळी चाळता चाळता एक छान ऑफिस कॉमेडी सापडली. दि आयटी क्राऊड. एक ब्रिटिश सीरीयल. एका कंपनीच्या आयटी डिपार्टमेंटमधल्या रॉय आणि मॉस या दोघा “आयटी” वाल्यांची आणि संगणकातलं हो का ठो कळत नसलेल्या त्यांच्या जेन या मॅनेजरभोवतीची ही सीरियल. नावात आयटी असलं तरी सीरियलमधे फारसं आयटी नाही. कोणालाही आवडू शकेल. तूफान विनोदी, कधी चावटही. काही निवडक संगणकीय उल्लेख आहेत जे माझ्यासारश्या संगणकीय किड्यांना नक्कीच आवडतील. शिवाय, एका सीझनमधे अर्ध्या अर्ध्या तासाचे सहा भाग, असे तीन सीझन. निम्म्या दिवसात अख्खी सीरीझ बघून होते आणि पुन्हा पुढचे कार्यक्रम बघायला आपण मोकळे.
गेले काही दिवस ब्ल़ॉगवर जरा ब्रेक घेतला होता. घरी बरीच आवराआवरी करायची होती, रूममेटसाठी जागा करायची होती , नुकताच घेतलेला टेकन-६ खेळून पहायचा होता, नवीन चहांचा आस्वाद घ्यायचा होता इत्यादी इत्यादी. नाही म्हणायला ब्लॉगच्या पडद्याआड काही उद्योग चालू आहेत. उत्साह टिकला तर ते ड्राफ्ट्स चक्क पोस्ट्स बनून बाहेरही येतील, कोणास ठावूक.
आज इस्टर झाला. आम्हाला गुड फ्रायडेची सुट्टी नव्हती. शुक्रवारी बोर झालं होतं. आयटी क्राऊडमुळे निदान संध्याकाळतरी छान गेली.
आज बस इतनाईच.
~नॅकोबा !