हा माझ्या घराच्या बाल्कनीत उभा राहून काढलेला फोटो… ते गाड्यांच्या पार्किंगच्या अलिकडे दिसतंय ते चिपोट्ले. मेक्सिकन गुर्रमॉं का काहीतरी असं त्याचं पूर्ण नाव आहे. या त्यांच्या साईटवर तपशील बघा. इथे काही निवडक पण उत्तम मेक्सिकन पदार्थ मिळतात. ताको, बुरीटो वगैरे. रोज घरीच स्वयंपाक करायचा या विचारानेच मला कंटाळा येतो त्यामुळे कधीकधी मी इकडून बुरीटो आणून खातो, विशेषकरून रात्री.
छान प्रकार असतो. भात, ब्लॅक बीन्स, फाहीता, कोंबडी, तिखट आणि सौम्य साल्सा, मका, चीज, सावरक्रीम आणि लेट्यूस असं सगळं असतं यात. मी बोल मधे घेतो नाहीतर हा प्रकार पोळीसारख्या एका पदार्थात (टॉर्टिया?) गुंडाळून येतो. तुम्हाला हवं असल्यास इतर प्रकारचे मांस किंवा ग्वाकामोली पण घेता येते. एकूणच हा प्रकार पोटभरीचा असतो आणि पौष्टिक पण ( अतिरेक केला नाही तर )
इथे येऊन मला तीन महिने होत आले, घराच्या शेजारीच ही जागा असल्याने मी इथे वरचेवर जातो त्यामुळे तिथल्या कर्मचारी बंडू आणि बंड्या आता मला चेहेऱ्याने ओळखू लागल्यात. मला मिळणाऱ्या क्वांटिटीतून हे स्पष्ट जाणवतं. आधी वाढू का नको असं करणारे हात आता बिनधास्त असतात. मजा वाटते. अंदाज घेऊन त्यांचे हात थांबवायची जबाबदारी आता माझ्यावर आहे. एकट्याला एवढं जात नाही आणि टाकणं जिवावर येतं. भरपूर खाऊन पोट टम्म झाल्यानं असं जागत बसावं लागतं ते वेगळंच…
तरीपण झोपतो आता. उद्या सकाळी सकाळी सॅन फ्रान्सिस्कोला जाणारी ट्रेन गाठायचीय. ट्रिपचा बेत आहे.
आपला, (टम्म)
~नॅकोबा

एकदम सहमत. आप्पूनका भी फेव्हरेट है चिपोटले… पण मला बरिटो जरा हेवी होतं. त्यामुळे मी Crispy Taco घेतो बरेचदा. आणि त्याच्याबरोबर चिप्स आणि सालसा ..
मस्त झालीये पोस्ट
@हेरंब: धन्यवाद