ऐश्यपत तुम्हाला सांगतो. (संपलं वाक्य… )
या पोष्टीत मी काहीबाही बरळणार आहे ( नेहेमीची सवय ) कदाचित वाचकांना (कंस१=( माझी पोष्ट वाचताना मी वाचक असतो त्यामुळे मी वगळून इतर . पण हे इथे लिहायची काहीच गरज नव्हती)) काहीच समजणार नाही ( मी (सुदैवानं. (आता सुदैव कोणाचं ते माहीत नाही) ) ब्लॉग हस्ताक्षरात (माझ्या, पेपर संपतानाच्या) लिहीत नसल्यानं वाचकांना (कंस १) काहीबाही समजत असेल असा माझा अंदाज आहे. (केवळ मी पुण्याचा आहे यावरून या वाक्याचा विपरीत अर्थ काढू नये. नाहीतर म्हणाल की आम्ही एवढं आमचं डोकं (?) शिणवून ब्लॉग वाचतो. आणि हा बंड्या म्हणतो की आमची समज (?) बेताचीच आहे)
हां. तर विषयाकडे.
गेले जवळजवळ तीन चार महिने रात्रंदिवस (पहिले दोन महिने नऊ ते पाच, नंतर सात, आठ नऊ, साडेबारा.. इत्यादी) काम करून आमच्या टीमनं काम पूर्णत्वास आणलं होतं. आधी मार्चची तारीख, त्यात चार गोष्टी वाढवायच्या असं ठरल्यामुळं ती एप्रिल अखेरीस येऊन ठेपली. एक एक काम आटपत टीमनं सोमवारी ” रीलीज आटपला ” टेस्टिंग ओके आलं की काम फत्ते या स्थितीत गोष्टी आणून ठेवल्या. मंगवारी एक-दोन किरकोळ गोष्टी समोर आल्या, यायच्याच. अपेक्षित होतं. त्या हातावेगळ्या करत होतो. दरम्यान. आम्ही पूर्णत्वास आणलेल्या कामावर आधारित एक डेमो व्हिडिओ तयार करण्याचं काम दुसरीकडे सुरू होतं. तिकडून बोलावणं आलं “क्लिक केलं, पेज आलं पण पेजवर काहीच दिसत नाहीये”. गेलो, शिफ्ट रिफ्रेश केलं, फायरफॉक्स चा कॅशे मोकळा केला. पेज नीट चालणं सुरू… कधीकधी नेटवर्कचा प्रॉब्लेम, ब्राऊजर कॅशे वगैरे मुळे पेज लोड न होण्याचा प्रकार होऊ शकतो. नॉर्मल आहे म्हणून सोडून दिलं…
थोड्या वेळानं परत तेच ! गेलो, रिकामं पान. फायरफॉक्सला म्हणलो बाबारे, पानाचा मूळ स्रोत दाखव. बघतो तर काय, स्रोत व्यवस्थित, सगळं जिथल्यातिथे ! किस्सा…. शंकेची पाल चुकचुकली… जाग्यावर परत आलो आणि माझ्या खोक्यावर तोच प्रश्न उद्भवतोय का ते बघायला लागलो (दवे बाई या कृतीला बग रीप्रॉडक्षन म्हणतात). माझ्या खोक्यावर येईना… म्हणून जिथे टेश्टिंग होतं त्या खोक्यावरच्या टेस्ट साईटला हिट करून पाहिलं. चार पाच प्रयत्नातच पान रिकामं… आजून एक दोनदा प्रयत्न… मधेच कधीतरी व्यवस्थित पान, मधेच कधीतरी रिकामं… ढिश्क्यांव.
ब्राऊझर इश्शू… इंटरनेट एक्सप्लोररला आम्ही नेहेमीच शिव्या घालतो हो. कोणतंही वर्जन असो, सहा, सात, नऊ, पंच्याण्णव… इंटरनेट एक्सप्लोअररचं काहीतरी वेगळंच असणार पण या वेळी मात्र गंडणारा ब्राऊझर फायरफॉक्स….. फारयफॉक्सनं काशी केली… सचिन डकवर गेला की कसं वाटतं??? डोक्याला शॉट. शोधमोहीम सुरू…
कोणकोणत्या पेजेसवर येतोय? निम्म्याहून जास्त वेळा पेज लोड होतंय नीट, म्हणजे जावास्क्रिप्ट, सीएसएस व्यवस्थित दिसतंय… रिक्वेस्टनंतर कोणती स्क्रिप्ट कधी लोड होत्ये… इकडे अॅलर्ट टाक… लॉग फाईल्सची शेपूट पकड… अॅप्लिकेशन सेटिंग्ज बदल, ब्राऊजर सेटिंग्ज बदल, कॅशिंग होत नाईये नीट, सर्वर कॅशे बंद करून बघ. डिस्क नको, मेमरीत कॅशे चालू असूदे… आता मेमरी नको डिस्क ठेव… गेल्यासारखा वाटतोय का??? हा बघ झाला रीप्रोड्यूस… कॅशे बंद करून बघ बरं… केले… आता स्क्रिप्ट एरर… परत रिकामं पान….
नेटवर बघा काय म्हणतायत… काही जण व्हिस्की इश्शू आहे असं म्हणतायत…. काही जण फायरफॉक्स इश्शू आहे म्हणतायत. चायला ब्राऊझर स्पेसिफिक इश्शू… आली का पंचाईत… एकट्यासाठी हॅक वापरावा लागणार आता…
विंडोज एफ एफ की उबुंटू? दोन्हीकडे येतोय? आईचं काय म्हणणं आहे… तिकडे नुसतीच जेएस एरर, ती पण गेली लेटेस्ट चेंजेसमुळे आई ओके आहे… सफारी पण मस्त चाललाय. क्रोमला अॅक्टिव सपोर्ट नाही पण तोही नीट आहे… फायरफॉक्स ब्लॅंक पेज… सर्च मारा…. फायरफॉक्स इश्शू आहे हा… थ्री पॉइंट सिक्स पॉइंट थ्री… बरेच जण म्हणतायत नेटवर. इश्शू आहे. फायरफॉक्स बग आहे हा… पण फायरफॉक्स अनसपोर्ट करून चालणार नाही… (एक वेळ पाण्याला नाही म्हणतील… फायरफॉक्स किंवा आईला शक्यच नाही…)
कशामुळे होत असेल?
ब्राऊजर सेंसेटिव आहे.
एक्सएचटीएमएल चेक करा.
नीट आहे.
सीएसएस वॅलिडेटेड आहे का?
हो
तो टायनी एम सी ई… विझीविग एडिटर… कम्प्रेसर वापरतोय, प्लगिन्स लोड करायला… फक्त टायनीवाल्याच पेजेसवर इश्शू आहे…
तो इनवॅलिड रेफरन्सनंतर बॉडी हायजॅक तर करत नसेल?
डिसेबल करून बघ,
आयला, एरर
स्टेप बाय स्टेप करून बघ लोड.
होतय, मेनूला एरर आहे.
टायनीएमसीई ब्लॅंक पेज सर्च मार…
ह्ये बग… सेम केस राव. आधी सापडायला हवी होती. दोन दिवस फुक्कट गेले.
जे एस पानाच्या शेवटी टाका म्हणतायत.
टाकल्या
चालतंय रे
टेस्ट सर्वर अपडेट करतोय, ते झालं की रीप्रोडक्शन करून बघा.
नाही होते.
नक्की
हो
चला, टेस्टिंगवाल्यांच्या हातात देऊया आता. उद्या कळेलच परिस्थिती.
तर,
सांगायचा मुद्दा असा. की गेल्या तीन महिन्यात जेवढा झाला नसेल तेवढा डोक्याचा भुगा गेल्या दोन दिवसात झालाय. म्हणलं थोडा वाटावा ब्लॉगवर. तेवढंच उगाच काहीतरी (म्हणजे नेहेमीसारखं) लिहिल्यासारखं वाटेल.
आणि सांगायचा दुसरा मुद्दा असा की जर टायनी एमसीई वापरत असाल आणि रिकामं पान येत असेल तर इनिशिअलायझेशन स्क्रिप्ट्स पानाच्या तळाशी टाकाव्यात (खरं तर पानात काहीच टाकू नये म्हणतात… पण असो…)
आता मी माझ्या वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्टकडे वळतो. शुभरात्री, शब्बा खेर वगैरे
(शब्बा खेर ही अनुपम खेरची कोण?)
(कोणी का असेना, मी मात्र)
आपला,
~नॅकोबा
Pingback: Tweets that mention कोडचा किडा कडाडला कोड्यानं कोडर कडमडला -- Topsy.com
mala tar kahich samajale nahi, paN je kahiahe, tyane maatra ek lakshat ale ki khup vaiT problem hota..
मस्त आहे. तुम्ही कोडींगचे अगदी बादशाहा दिसता.
अशा माहित नसलेल्या एरर्स काढण्यातच तर खरी मजा येते.
गुड लाईफ़.
फारयफॉक्सनं काशी केली… सचिन डकवर गेला की कसं वाटतं???
एक वेळ पाण्याला नाही म्हणतील… फायरफॉक्स किंवा आईला शक्यच नाही…
झक्कास नॅकोबा.. यकदम नॅको इष्टाईलीत आहे.
>> फारयफॉक्सनं काशी केली… सचिन डकवर गेला की कसं वाटतं???
आणि
>> एक वेळ पाण्याला नाही म्हणतील… फायरफॉक्स किंवा आईला शक्यच नाही…
हे दोन तर ब्येष्टच होते.. !!
field बदलतं पण अस्ले कोड(गे) मनस्ताप अग्दी तस्सेच अस्तात….. अणि ते सुट्ल्यावर जे क्काय वाट्ट ते पण तस्संच अस्त!

पोष्ट कळली नाही पण भावना पोचल्या…. भरपूर सहानुभूती…. (कारण मी पण नुकतीच अस्ली मनस्तापजनक अनुभूती घेऊन आलेय!)
प्लॉटर प्रॉब्लेम…..सीटीबी चेक करा….काळं ड्रॉइंग रंगीत आलं… रंगीत ड्रॉइंगला काळं फासलं…. प्रिन्टरचा मूड खराब झाला…. ऑटोकॅडाच्या **** ला झोप आली…..प्रिंट काढ्ल्यावर क्लाएंटरावांना नवीन काहीतरी हवं झालं!!!
आता ही पोष्ट वाचल्यावर माझा प्रॉब्लेम छोटा वाट्तोय!
Awesome post! I like the geeky posts more! (not that I dont like others
)
@Mahendra, खरंच जाम धावपळ करायला लावली त्या एका प्रोब्लेमनं सगळ्यांना. फुल शाळा झाली.
@हेरंब:
सिरीअसली अरे. फायरफॉक्स हा केवढा मोठा आधार असतो आमच्यासारख्या डेवलपरांना. तोच जेव्हा कोसळतो तेव्हा टांगणीला लागायची वेळ येते.
आरतीताई, खरंच मजा येते असले प्रश्न सोडवायला. काहीतरी केल्यासारखं वाटतं. एवढी धावपळ करूनही आम्ही उत्तरावर खूश नाहीच आहोत. पण सध्या काम स्थिर स्थितीत आणून ठेवलंय. मनाला पटेल असं उत्तर शोधायच्या मागे लागलोच आहोत सध्या.
आणि मी काही बादशाहा नाही बुवा कोडिंगचा. चव्वी किंवा सत्ती असेन कारण अत्ताशी कुठे छक्केपंजे कळायला लागलेत यातले.
रवी, तुझ्यामुळे ब्लॉगला एक नवीन शीर्शक सुचलं… गीकाई… आहेत का कोणी मराठी गीक्स उत्सुक? एकदम गीकी पोस्ट्स लिहायला ? एखादा सामुहिक ब्लॉग करू सुरू
अनुज्ञा, हुश्श वाटतं अगदी असे प्रश्न सुटल्यावर. आमच्या नशीबानं सध्या प्रोजेक्टमागे बदाबदा रिक्वायरमेंट्स बदलणारे क्लायंटराव नाहीयेत. बरं चाललंय.
सध्या तरी त्या चार तारका काय म्हणतायत असा प्रश्न पडलाय
nehamipramane bharee…..
Aawadesh