नाही, मी स्वयंपाक केला नाही. पण जर केला असताच मी उपमा तर जे काय झालं असतं त्याच्याशी आडून आडून ही पोस्ट निगडीत असू शकते. एक आपली वैधानिक सूचना इथेच देतो, की ही पोस्ट साधी सरळ नाही. वाचताना तिटकारा वगैरेही येऊ शकतो. ( तिटकारा चार तासांपेक्षा जास्त काळ राहिला तर थेट डॉक्टर गाठावा !!!
) पण ही मुक्ताफळं आहेत. बऱ्यावाईटाच्या लबाड कल्पना त्यांना मान्य नाहीत.
तर, सुरूवात! कधी कधी असं होतं, की मनात विचार दाटून येतात. तक्रारखोर, सत्य नाकारू पाहणारे, प्रश्नार्थक पण उत्तर नसणारे, मीच का, असंच का असे नको तिथं खोलात जाऊ पाहणारे अनेक प्रकारचे विचार. मग वाटतं त्यातल्यात्यात ही भानगड समजू शकेल असं कोणी गाठावं अन् हे वळवळणारं गाठोडं त्याच्यासमोर मोकळं करावं. तो गोंगाट, ती खळबळ ओतावी भस्सकन समोरच्यावर अन् शांत व्हावं. पण मन बेक्कार असतं. आपल्यायाच इतके सतावणारे विचार, समोरच्यावर कसे लादावेत असा प्रश्न पाडतं. उगाच गाऱ्हाणी सांगून कोणाला बोर करावं असं आपल्या मनाला तेव्हाही वाटत नाही.
उगाच गाऱ्हाणी सांगून कोणाला बोर करावं असं आपल्या मनाला तेव्हाही वाटत नाही.
मान्य… पण
तहान लागली की पाणी प्यावं, भूक लागली की खावं, नुसतीच लागली की लवकरात लवकर जावं अन् सर्वात महत्वाचं म्हणजे वात उगाच आडवू नये. परिणाम गंभीर होतात.
समोरच्याला जरा वेळ नाक धरावं लागेल, पण तुम्ही मोकळे व्हाल. समोरचा जरा वैतागेल, पण जवळचा असेल तर आवर्जून पाचक देईल. ते महत्वाचं. आजच रात्री घ्या, सकाळी…. ओके !!!
मोकळे व्हा. शेवटी मनाला न पचलेल्या (पटलेल्या) गोष्टींची निष्पत्ती म्हणजेच हे विचार !
अर्वाच्य भारी पोष्ट आहे….
या उपम्याचे स्वय़ंपाककर्ते आपणच असाल नही का?!
आणि मग शेवटी मन मोकळं झालं कि नाही, अजून अर्वाच्य उपमा गिळायला?!
नैचिकेत
अरे नेमकं काय म्हणायचंय? मला तर काहीच समजलं नाही ..
मीही महेंद्रकाकांच्याच पार्टीत आहे. नै झेप्या.
मला एवढंच म्हणायचंय की जर एखादी चिंता, तक्रार, कुरकुर मनातल्या मनात त्रास देत असेल अन ती कोणालातरी सांगावीशी वाटत असेल, तर त्या व्यक्तीला काय वाटेल असा विचार फार काळ न करता सांगून टाकावं आणि मोकळं व्हावं.
अन हो, या अर्वाच्य उपम्याचा स्वयंपाककर्ता मीच. टंकून मोकळा झालो.