कोणीतरी म्हणलेलंच आहे. क्रियेवीण वाफाळता व्यर्थ आहे !! आठवड्याभरापूर्वी मागवलेले माझे वाफाळते आज घरी येऊन पोहोचले. माझा आनंद गगनात मावेना झाला, हात आभाळाला टेकले आणि स्वर्ग दोन बोटे उरला पण ती दोन्ही बोटं चहाचा मग धरून असल्यानं आजतरी खालीच थांबलो. अमृतसुद्धा अमृततुल्याइतकंच चांगलं असेलच असं काही नाही. माझ्या चहांचे हे काही फोटो :
ही पेटी मस्त आहे, सहा कप्पे वेगवेगळ्या चहांनी भरलेले. ग्रीन, लेमन, कॅमॉईल, जास्मिन, इंग्लिश ब्रेकफास्ट, अर्ल ग्रे वगैरे वगैरे. यातला अर्ल ग्रे अजून प्यायचाय. कॉम्प्लिमेंट्री आलेला अॅपल चाय गटकवून टाकला. आता एकूण सगळे चहा बघता पुढच्या सहा महिन्यांच्या चहाची आरामात सोय झाल्ये. एक मान्य केलंच पाहिजे, हे चहा पीत असताना छान वाटतं पण यात टपरीवरच्या कटिंगची किंवा आपण उठेपर्यंत किमान तीनदा उकळल्या गेलेल्या चहाची मजा यांत नाही.
आपला,
~नॅकोबा




हायला! चहा!!! ट्विनिंग्स!!!!!!
अर्ल ग्रे माझा खास आवडता चहा आहे… जस्मिन कधी मिळाला नाही…. कसाए?
हे चाहे एकट्या दुकट्यासाठीच असतात. टपरीवरचा चहा एकटयाने गिळवत नाही! त्यामुळे टपरी आणि अर्ल ग्रे मधे काही तुलनाच नाही. असं नाही का वाटत?!
@अनुज्ञा : >> टपरीवरचा चहा एकटयाने गिळवत नाही! << अगदी शंभर टक्के मान्य ! हे पुडीतले चाहे एकांड्यांसाठीच.
पिव्वर जास्मिन अजून मीही नाही ट्राय केला. माझ्याकडे जास्मिन ग्रीन आहे. त्याची एक मंद कडवट चव आहे. स्वच्छ, ताजी, आणि शांत अशी.
जस्मिन भंकस आहे एकदम. फुकटातही प्यायला नकोसा होतो. चहाला चमेलीचा वास..हॉरिबल!! चहाला फक्त सुंठ , मसाल्याचा वास बरा वाटतो. तसा मला ग्रिन लेमन टी पण आवडतो ( दिवसभर तोच ढोसत असतो – बिन साखरेचा.. डायबिटीस नाही मला , फक्त वजन वाढतंय म्हणून)