आज मला पोस्ट लिहायची आहे

आज मला पोस्ट लिहायची आहे.

मराठीत ज्याला इर्रेलवंट म्हणतात असं असंबद्ध काही बरळायचं आहे.
जमल्यास निरर्थक असंही काही खरडायचं आहे.
ड्राफ्ट अमाप झाले आज काही घडवून आणायचं आहे.
डोकं सुस्त झालंय त्यास बडवून काढायचं आहे.

खरं सांगतो, “निरर्थक” निर्मिती अवघड असते. संवादाच्या कोणत्याही माध्यमातून काहीही सादर केलं तरी त्याचे ग्राहक आपापल्या परीने त्या संवादाचा काही ना काही अर्थ काढतातच. ( ह्या ह्या ह्या, कॉमर्सच्या परीक्षांची आठवण झाली. तिथे असली यो वाक्य टाकली की मार्क्स मिळतात. ) उदाहरणार्थ:

माध्यमातून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या संवादाची कार्यक्षमता अन् टॉइंग मानल्या जाणाऱ्या चड्ड्यांच्या मागणीची लवचिकता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी सम प्रमाण राखून असतात. इन अदर वर्ड्स, efficiency of the communications broadcast through media (use the phrase “communication channels” here, sounds cooler) maintain a direct proportion to the demand elasticity of ‘chaddi’s which are believed to be “toiiing”
नुसतं बघायला गेलं तर ( वाक्याकडे, वाक्याकडे) ये तो बडा टॉइंग है ला काय अर्थ आहे. पण कळणाऱ्यालाच्या टॉइंग मनाला बरोबर कळायचं ते कळतं.

चड्डी…

काहि दिवसांपूर्वी एक अत्यंत किरकोळ अशी पोष्ट लिहिली होती. चड्डी अशा शीर्षकासह. ब्लॉगवर ती पोष्ट सगळ्यात जास्त वाचली गेल्ये. लोक चड्डी असा गूगल सर्च करून इथपर्यंच पोहोचतात. मी तसा कधीच पोहोचलो नाही. पण मी तो सर्च केला का नाही हा मात्र सस्पेंस ठेवतो.

फेब्रुवारी मार्च च्या सुमारास जेव्हा मराठी ब्ल़ॉग नियमितपणे लिहायला लागलो तेव्हा अगदी काहाही पोष्ट करायची तयारी असायची. हल्ली कोणाला घाबरतो देव जाणे. खरंतर कोणाचीही काहीही न ठेवता कोणत्याही विषयावर काहीही खरडायचा परवाना मला जन्माने (पुणे) मिळालाय, तरीही,  राजकारण, शिक्षणव्यवस्था, देव, अमेरिका या विषयांवर लिहायला कोण जाणे का पण नको वाटतं.

असं हून कसं चालेल? कोणीतरी म्हणलंच असेल

दिसामाजी निरर्थक खरडावे,
अकलेस पायदळी तुडवावे,
शब्दाने डोके उडवावे,
चित्ती असू द्यावे, समाधान !!

7 thoughts on “आज मला पोस्ट लिहायची आहे

  1. ….पण शिक्षण-अव्यवस्था,सरकार, आपण सोडून इतरांचा बावळटपणा किंवा अमेरिका यापेक्षा जास्ती इन्ट्रेस्टिंग विषय काय अस्तात?!
    आज मान्य केलं पाहिजे….निरर्थकपणा अस्तो!
    या निरर्थक पोस्टला भयंकर सॉलिड अर्थ आहे…. विषयाची गंभीर खोली आहे…. शब्दांची काव्यमय संबद्धता आहे…. एक जीवनानुभव आहे!
    (अजून काही राहिलं असेल तर ते पण आहे!)
    :P
    वाचून डोळे निवले!

  2. अनुज्ञा :

    या निरर्थक पोस्टला भयंकर सॉलिड अर्थ आहे…. विषयाची गंभीर खोली आहे…. शब्दांची काव्यमय संबद्धता आहे…. एक जीवनानुभव आहे!
    (अजून काही राहिलं असेल तर ते पण आहे!)
    :P
    वाचून डोळे निवले!

    UN:F [1.9.3_1094]
    Rating: 0 (from 0 votes)

    बापरे,
    एवढं काही मला खरंच अपेक्षित नव्हतं

  3. या पोस्ट मुळे मला पण एक विषय मिळालाय लिहायला. धन्यवाद..
    :) कुठला विषय?? समजेल लवकरच..

    बाय द वे.. हे मस्त जमलंय.
    दिसामाजी निरर्थक खरडावे,
    अकलेस पायदळी तुडवावे,
    शब्दाने डोके उडवावे,
    चित्ती असू द्यावे, समाधान !!

  4. झम्प्या कुठून कसा येथे पोचला माहीत नाही. पण अतिशय योग्य ठिकाणी पोचला. तुम्ही जे निरर्थक खरडले ते झ्म्प्याने त्याच्या निरर्थक २ मिनिटात वाचून संपवले.आणी एकाच शब्द तो तीनवेळा निरर्थकपणे बरळला…वाह वाह वाह !

  5. Pingback: ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात? | काय वाटेल ते……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>