अॅर्नॉल्ड पामर

अॅर्नॉल्ड पामर

अॅर्नॉल्ड पामर

आईस टी अन् थंडगार लेमोनेड ( लिंबू की मुसुंब की इडलिंबाचं गोड्डड्डड्ड  सरबत ) यांचं एक अत्यंत चविष्ट मिश्रण. यालाच अॅर्नॉल्ड पामर असेही म्हणतात. विकिपीडियावर  “ए आर एन ओ एल डी स्पेस पी ए एल एम ई आर शिफ्ट ९ डी आर आय एन के एस शिफ्ट ०  ” असा शोध घ्या, मी काय म्हणतोय ते कळेल.

एरवी कैक बाटल्या आईस टी पिणाऱ्या लीडने आज “कोणी शेअर करणार का?” असं विचारलं तेव्हा मी “हा माणूस तर ठणठणीत दिसतोय, एकदम असं काय झालं” नजरेनं पहातच हो म्हणलं. थंडगार चहाची अर्धी बाटली माझ्या कपात रिकामी झाल्यावर मग त्या रहस्यमय वागणुकीचा उलगडा झाला.  अर्धी बाटली लेमोनेडनं पूर्ण भरली जाताच मीसुद्धा कप पुढे केला.  आहाहा ! आनंद !!!

काही जण लेमोनेड ऐवजी संत्र्याचा रस देखील वापरतात. यातच व्होडका मिसळली की “जॉन डेली” तयार!! पण प्रॉब्लेम एवढाच ही मी दारू पीत नाही. तुम्ही कधी ट्राय केलंतच तर मला चव नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>