सूचना. : ही थोडी तसली पोस्ट आहे त्यामुळे हे असलं काही ज्यांना आवडत नाही त्यांनी वाचणं इथेचच थांबवावं.
टमरेल.
हे रंगीत असतं. (असावं, तेवढंच बरं वाटतं )
याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार… (तळटीप… तिथे समजेल)
याच्यामुळे “शून्यात बघणं सोपं जातं.” पर्यायानं, चित्त एकाग्र करणं शक्य होतं.
चित्त एकाग्र असलं की माणूस मोठमोठे चिवट, बिकट आणि कठीण प्रसंग सहज हातावेगळे करू शकतो.
पाणी हेच जीवन…
उदाहरणादाखल पहा :
ओलिताखालील प्रदेश विरूद्ध कोरडवाहू प्रदेश
हिमालय विरूद्ध ग्रॅंड कॅन्यन
अॅमेझॉन विरूद्ध सहारा
आता हे पहा… (घाबरू नका, फक्त लिहिलेलंच वाचायला सांगतोय)
नदीचं पाणी समुद्राला मिळतं
समुद्राच्या पाण्याची वाफ होते.
वाफेचे ढग बनतात
ते वाऱ्यासोबत वाहतात
जिथे ते ढग गार होतात तिथे पाऊस पडतो
डोंगराशी ढग आडत असल्यानं तिथे जास्त पाऊस होतो आणि जंगल निर्माण होतं.
मग काही लाकूडतोड्यांवर खर्च करून आपण ते जंगल तोडतो.
पुन्हा ट्रक, पेट्रोल वगैरे गोष्टींवर खर्च करून ती लाकडं शहरांत आणतो.
पुन्हा, कामगार, वीज, यंत्रसामुग्री वगैरेवर खर्च करून आपण त्या लाकडांचा घट्ट रस वगैरे काहीसा तयार करून त्याचा कागद तयार करतो.
स्वाभाविकच, निसर्गापासून एवढा लांबचा आणि निसर्गास घातक असा प्रवास करून आलेला कागद… त्यात निसर्गाचा तो ओलावा नसतोच मुळी…
याउलट सरकारनं धरणं तुमच्यासाठी बांधली आहेत. पाणीकपात असेल तर पर्यायानं पाण्याचा वापर कमी होतो आणि खर्चही वाचतो. (तो कप नंतर इतर कुठे वापरू नये. ) शिवाय, नदी – समुद्र – पाऊस – झाड – ट्रक – फॅक्ट्री – दुकान – घर यापेक्षा नदी – धरण - घरची टाकी – नळ – टमरेल हा बराच सुटसुटीत प्रवास आहे.
कागदानं आग पसरते. आग विझवायला अग्निशामक दलही पाणीच वापरतं….
शेवटी पाणी ते पाणी आणि कागद तो कागद ( स्रोत : आयुष्यावर बोलू काही (कार्यक्रम) )
टमरेल काय किंवा कागद काय… काय वापरायचं ते तुमच्या हातात आहे …
तळटीप -
: वाचलंतच ना इथपर्यंत… वाटलंच मला !!
: पूर्वी रेडिओ पुणे स्टेशन वर ही फर्निचरच्या दुकानाची जाहिरात लागायची. आजूनही लागत असेल माहित नाही… त्यात “याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार…” अशा ओळी होत्या. त्या जाहिरातिच्या वेळेत मी नेमका अभ्यासात असायचो (नाहितर रेडिओवरच्या जाहिरातीकडे कशाला जातंय लक्ष..) तेव्हापासून जेव्हा जेव्हा “याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं (रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार…)” हा वाक्प्रचार येतो तेव्हा पुढचं म्हणल्यावाचून (मनातल्या मनात का होईना) राहावत नाही.. (वाक्यात मधे कुठेतरी “स्वप्नासारखे सुंदर घर प्रत्यक्षात उतरते” अशा ओळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्की आठवत नाईये. )
“टमरेल काय किंवा कागद काय… काय वापरायचं ते तुमच्या हातात आहे …”
आवराssssssss!!!
मराठी माणसं आम्ही. त्या साठी जुना डाल्डाचा डब्बा वापरायची पध्दत होती.
पोस्ट लै खास!
Your post reminded me of a mail with subject “Puran[confidential]” , I got long time before!
Have read it?
मेलो मेलो वाचवा…..:) ते रविंद्रचं कनेक्शन पहिल्यांदा लक्शातच आलं नाही…आलं तेंव्हा मध्यरात्री हसू आवरलं नाही. (हिला अचानक काय झालं बाकिचे किलकिल्या डोळ्यांनी पहातायत.)…..इनोसंट आचरटपणाचा कहर आहे…..