पॅक मॅन
पॅकमॅनच्या तीसाव्या वर्षानिमित्त आज गूगलने चक्क त्यांच्या सर्च पेजवर त्यांचं पहिलंवहिलं चालतंखेळतं डूडल चितारलं. एरवी दिवसानुरूप रंग बदलणाऱ्या गूगलच्या त्या पानावर एका आयतात गूगल अशी इंग्रजी अक्षरे लेऊन त्याच्या भोवती पॅकमॅनचा खेळ सिद्ध झाला. ऑफिसमधेही थोडा विरंगुळा मिळाला. माझ्यातला गेमर सुखावला.