तीसमारखान
पाहिला.बरा आहे.
इथे “बरा आहे” हे फारच सापेक्ष वर्णन आहे. मी नमूद करू इच्छितो, की तीसरी ऑंख, द्रोणा, अक्सर, नो स्मोकिंग आणि टशन चित्रपटगृहात पाहिल्यानंतर चित्रपटच्या दर्जाची दारिद्र्यरेषा फारच खाली जाऊन टेकते. (बाय द वे, मला टशन आवडला होता अशी शंका बरेच दिवस माझ्या मनात घर करून आहे.)
तर उपरी गवाहोंको मद्देनजर वगैरे रखते हुवे मी असं म्हणतो की तीसमारखान “बरा” आहे. बळंच न हसवता मनापासून हसवेल असा विनोद मधून अधून येऊन जातो बाकीचे विनोद बळंच होतात. सगळेच जण आपण “अॅक्टिंग” करत आहोत हे वेळोवेळी जाणवून देतात. सगळंच जरा फारच कृत्रिम वाटत राहतं. अक्षय कुमार आणि विनोदी चित्रपट या मिश्रणाकडून अपेक्षित समाधान या चित्रपटात सापडत नाही. शीला की जवानी आणि कतरीनाचे कपडे ही त्यातल्यात्यात जमेची बाजू. त्याव्यतिरिक्त ती चित्रपटभर अशक्य बोर मारते. नाही म्हणायला अक्षय खन्ना आणि अक्षय कुमार यांचे एकत्रित असे काही सीन्स जरा उठून दिसतात.
बाकी मनोज “डे” रामलन, या सगळ्यामागं स्टीवन स्पीलबर्गचं कारस्थान आहे वगैरे संकल्पना मला आवडल्या. बाबांशेजारी बसून “शीला की जवानी” मनापासून एंजॉय करणं माझ्याच्यानं शक्य झालं नाही. एका गाण्यात सलमान नाचलाय. मला हल्ली सलमान आवडत नाही.
खानों मे खान… तीसमार खान हे वारंवार ऐकताना मला “वन टू थ्री” नावाच्या सिनेमात वरचेवर पार्श्वसंगीत म्हणून वाजणारं “एवरीबडी सिंग…. बेहेन दा टकाज्” आठवलं. काहीही आठवतं. तीन लक्ष्मीनारायण वाला वन टू थ्री तीसमार पेक्षा बरा होता.
असो.
“कोणालाही झेपण्याच्या मानानं जरा जास्तच कमनीय असल्यानं कधी कोणाच्या हाती लागायची नाही अशी ती शीला अन् तिची तरूणाई तशीच चिरतरूण राहो” हीच सदिच्छा!!
~नॅकोबा