ब्लॉगवर लिहिण्याचा नवीन पर्याय
ही ब्लॉग पोष्ट मार्कडाऊन सिंटॅक्स (रचनाक्रम) वापरून लिहिली आहे. लिहिण्याकरता वापरलेल्या सॉफ्टवेअरचं नाव आहे मार्कपॅड. यात एका बाजूला तुम्ही मार्कडाऊन सिंटॅक्स वापरून लिहिता अन् लिहिता लिहिताच शेजारच्या बाजूला त्याचं एचटीएमएल स्वरूप दिसतं. याच सॉफ्टवेअरमधे तुम्हाला तुमचा वर्डप्रेस ब्लॉग कॉन्फिगर करता येतो जेणेकरून लिहून झालं की थेट ब्लॉगवर प्रकाशित करता येईल. …